रोजगारनिर्मितीसाठी मेळघाटात अधिकाधिक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:04+5:302021-06-16T04:16:04+5:30

अमरावती : मेळघाटात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने बचत गटांच्या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ...

More and more activities in Melghat for job creation | रोजगारनिर्मितीसाठी मेळघाटात अधिकाधिक उपक्रम

रोजगारनिर्मितीसाठी मेळघाटात अधिकाधिक उपक्रम

Next

अमरावती : मेळघाटात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने बचत गटांच्या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी मेळघाटमधील विविध गावांना भेट देऊन तेथील उपक्रमांची तसेच आरोग्य यंत्रणेचीही पाहणी केली. यावेळी धारणी तालुक्यातील दिया येथील भेटीदरम्यान ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी याप्रसंगी उपस्थित होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिया उपसिंचन प्रकल्पास भेट दिली व स्थानिकांकडून विविध बाबींची माहिती घेतली. मेळघाटात रोजगारनिर्मिती बचत गटांच्या साह्याने विविध उपक्रम राबवावेत. नागरिकांना विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी धारणीचे उपजिल्हा रुग्णालय व विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली आणि लसीकरण केंद्रांचीही पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सामग्रीच्या अनुषंगाने प्रस्ताव द्यावेत. मेळघाट क्षेत्रात संपूर्ण लसीकरणाच्या दृष्टीने लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव भरीव जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

शासनातर्फे जारी जनहितपर आवाहनाचा मजकूर सुस्पष्टपणे वाचून इतरांना सांगणाऱ्या दिया येथील एका चिमुकलीचे तसेच विज्ञान विषयाची माहिती इंग्रजीत सुबक अक्षरात अचूकपणे मांडणाऱ्या व विषाणूची उत्तम आकृती रेखाटणाऱ्या चोपण येथील एका विद्यार्थ्याचे कौतुक करीत त्यांनी या दोन्ही बालकांना पेन भेट दिले.

बॉक्स

नागरिकांशी संवाद

धारणी तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रामध्ये येत असलेल्या चोपण या अत्यंत दुर्गम गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. घरकुलाची प्रलंबित देयके, सामाजिक अर्थसाहाय्य योजना, रोजगार हमीची कामे याबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

Web Title: More and more activities in Melghat for job creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.