आधार कार्डवर जोशी प्रमाणपत्रावर मोरे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:17 PM2019-02-01T23:17:49+5:302019-02-01T23:18:18+5:30
दर्यापुरातील एका लॉजवर बस्तान ठोकून हात, चेहेरा व छायाचित्र बघून भविष्य कथन करण्याचा दावा करीत सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भोंदू ज्योतिषाचा भंंडाफोड गुरुवारी अंनिस व संभाजी ब्रिगेडने केला होता. हा जोतिषी बनावट नावाने वावरत असल्याचे उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : दर्यापुरातील एका लॉजवर बस्तान ठोकून हात, चेहेरा व छायाचित्र बघून भविष्य कथन करण्याचा दावा करीत सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भोंदू ज्योतिषाचा भंंडाफोड गुरुवारी अंनिस व संभाजी ब्रिगेडने केला होता. हा जोतिषी बनावट नावाने वावरत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याजवळील कागदपत्रे तपासल्यावर सदर जोतिषी चंद्रपूर भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अजय जोशी या नावाने व्यवसाय करीत असलेला हा भोंदू मूळचा अजय शंकरू मोरे आहे. त्याच्याजवळील कागदपत्रांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सदर ज्योतिषाने दर्यापुरातील लॉजवर मुक्काम करून ज्योतिषाचार्य व फलज्योतिषी असल्याबाबत पत्रके शहरात वाटली होती.
विशेष म्हणजे, या ज्योतिषाने दर्यापूर शहरात दुसºयांदा एन्ट्री केली आहे. यापूर्वीही अनेकांनी संपर्क साधत आपल्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी भोंदूकडून उपाय घेतले होते. हा ज्योतिषी पैसे घेऊन ग्रहदोष, बाधा, संतानयोग, पितृदोष, महादशा आदी उपाय व उपचार देण्याचे आमिष देत असे. त्या आशयाची पत्रकेही वाटली होती व ग्राहकांना आकर्षित केले होते. या ज्योतिषीने शहरात २५ जानेवारीपासून येऊन आपला व्यवसाय थाटला होता. त्याला भेटण्यासाठी शहरातील तब्बल ३० ते ३५ लोकांनी भाग घेतला होता
विशेष म्हणजे, हा ज्योतिष्य कम्प्युटर काळजी कुंडली काढूनसुद्धा देण्याचे सांगत होता. मात्र, यावर आक्षेप घेत गुरुवारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व संभाजी ब्रिगेडने पोलिसांत कारवाईची मागणी केली होती. यावर पोलिसांनी पाचारण करीत ज्योतिषाची झाडाझडती घेतली होती. यावर माफी मागून शहरातून पोबारा केला होता. नाव बदलून ग्राहकांना फसविणाºया भोंदू जोतिष्याचा निषेध करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, विशिष्ट समाजाचे नाव वापरून बदनाम करण्याच्या षड्यंत्राला लगाम लावण्याची मागणी केली आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोण्या धर्माच्या किंवा सण परंपरांच्या विरोधात नाही; मात्र धर्माच्या नावावर नागरिकांच्या श्रद्धांचा व्यापार करणाऱ्या भोंदूंविरोधात जोरकसपणे मैदानात उतरली आहे. दर्यापुरात आढळून आलेला ज्योतिषी हा मूळ नाव बदलून भोळ्या लोकांची आर्थिक लुबाडणूक करीत होता. अर्थात या विषयाचा विज्ञानाशी कुठलाही संबंध नाही. सामान्य नागरिकांनी यापासून सावध राहावे.
- शेखर रेखे
जिल्हा संघटक, अंनिस