मार्निंग वॉक आरोग्यासाठी की, कोरोना घरात आणण्यासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:36+5:302021-05-27T04:12:36+5:30
शहरात विविध मार्गावर, मैदानातील ट्रॅकवर, शिवटेकडी, सायन्सकोर मैदान, जिल्हा स्टेडियम आदी मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळ-सायंकाळ वाॉकिंग करीत ...
शहरात विविध मार्गावर, मैदानातील ट्रॅकवर, शिवटेकडी, सायन्सकोर मैदान, जिल्हा स्टेडियम आदी मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात नागरिक सकाळ-सायंकाळ वाॉकिंग करीत असताना चेहऱ्यावर मास्क नसल्याचे दिसून आले. कोरोना विषाणूचे वाहक असलेले वा क्वारंटाईन असलेले नागरिकदेखील ट्रॅकवर विनामास्क फिरत असल्याने इतरांना आपसुक कोरोनाची लागण होताना निदर्शनास येत आहे.
बॉक्स
पोलिसांकडूनही सूट
अनेक नागरिक बिनधास्त फिरत असताना पोलिसांनी कारवाई केली. मात्र, काहींनी पोटाचा प्रश्न समोर केल्याने वा आजारासंबंधी मुद्दे मांडल्याने पोलिसांना हतबल होऊन त्यांना सोडावे लागल्याचे चित्र आहे. आधीच पैसा जवळ राहिलेला नाही, त्यातही कसेबसे काम मिळाले तर त्यात पोलिसांनी अडविल्यानंतर कामगारांचा संताप पोलिसांना ऐकावा लागत असल्याने पोलिसांकडूनही सूट देण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
बॉक्स
मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या ५० जणांविरुद्ध कारवाई
कोरोनाकाळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गाडगेनगर पोलिसांनी माॅर्निंग वॉकला जाणाऱ्या ५० जणांविरुद्ध विनामास्क व सोशल डिस्टंनसिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बॉक्स
मैदानावर खुली हवा नव्हे, कोरोनाचे विषाणू
कोरोनाबाधित रुग्णांनीदेखील आरोग्य जपण्याच्या उद्देशाने मार्निंग वॉकला जाणे सुरू केल्यामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. त्यात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारची व्यक्ती धावत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होऊन इतरांनीही लागण होत आहे. त्यामुळे मैदानावर खुली हवा मिळण्याऐवजी कोरोना विषाणूच मिळत असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया
माझे वय ४२ वर्षे, वजन ९० किलो आहे. मी १५ ते १६ वर्षांपासून सातत्याने सकाळ-सायंकाळ वॉकिंग करतो. त्यामुळे कुठल्याही आजाराला बळी पडलो नाही. आरोग्यावर मेडिसीनचा अतिरिक्त खर्च करण्याऐवजी व्यायामात सातत्य राखल्यास कुठलाही आजार वास करणार नाही, हा माझा अनुभव आहे.
- शरद बावणे, नागरिक
वॉकिंग करताना कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह याची कल्पना नसते. मात्र, आपल्यासोबतची माणसे निगेटिव्ह असल्याची खात्री असते. तरीदेखील वाॅकिंग दरम्यान कुणी शिंकतात, खोकलतात, हसतात, ओरडतात. तेच पॉझिटिव्ह असल्यास इतरांपर्यंत कोरोना विषाणू पोहचण्यास मदत होईल आणि त्यांच्यामार्फत कोरोना थेट घरापर्यंत पोहचेल, हे निश्चित.
- रमेश राठोड, नागरिक
अशा महामारीत व्यायाम अत्यावश्यक झाले आहे. मॉर्निंग वॉकला जाताना तोंडावर मास्क असतोच, शिवाय एकमेकांपासून तीन फुटांचे अंतरदेखील राखले जातात. सतत चालताना धाप लागल्यास थोडावेळ हनुवटीवर मास्क येत असला तरी सुरक्षितता बाळगली जाते. तसेच थेट जाणे-येणे असल्याने कोरोना होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
- सोनाली संजय गुल्हाने, संताजीनगर,