पांदन रस्त्यांवर ग्रामस्थांचा ‘मॉर्निंग वॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:46 PM2018-01-06T23:46:50+5:302018-01-06T23:47:24+5:30
विरली ते मासळ रोडवरील उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करून संपूर्ण भंडारा जिल्हावासीयांना स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर आता या जागेचा उपयोग मॉर्निंग वॉक, दौड, व्यायाम व बैठक व्यवस्थेसाठी नागरिक करीत आहेत.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : विरली ते मासळ रोडवरील उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करून संपूर्ण भंडारा जिल्हावासीयांना स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर आता या जागेचा उपयोग मॉर्निंग वॉक, दौड, व्यायाम व बैठक व्यवस्थेसाठी नागरिक करीत आहेत.
मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरलेली ही जागा आता त्याच मानवी आरोग्याला तंदुरूस्त ठेवण्यासाठी उपयोगी ठरत आहे. उघडया हागणदारीच्या जागेनंतर आता गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याचा महत्वाचा निर्णय ग्रामपंचातयने हाती घेतला आहे.
जल ही जीवन म्हणून ज्याला संबोधल्या जाते त्या जलाच्या स्त्रोतांना सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची स्वच्छता मोहीम हाती घेवून जीवनाला वाचविण्याचा प्रयत्न आदर्शवत ठरणारा आहे.
लाखांदूर तालुक्यातील विरली बुज. येथे सरपंच लोकेश भेंडाकर, उपसरपंच सिंव्हगडे, ग्राम विकास अधिकारी वरूडकर यांचे नेतृत्वात ग्राम पंचायत पदाधिकारी व गावकºयांच्या सहकार्याने उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी काही दिवसापासून पुढाकार घेण्यात आला आहे. गावातील मासळ रोडवर असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करून उघडया हागणदारीची स्थिती नष्ट करण्यात आलेली आहे. तर उर्वरित अन्य ठिकाणीही २६ जानेवारीपर्यंत सुशोभित करण्यात येणार आहेत.
मासळ रोड लगत करण्यात आलेल्या उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यात आली असताना रस्त्याच्या बाजूला असलेले खताचे उकरीडे हटविण्यात आलेले आहे. दोन्ही बाजूला नेट लावण्यात आलेली आहे.
बैठक व्यवस्थेसाठी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. स्ट्रिट लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वच्छ व सुंदर जागा आता नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी खुनावते आहे.
मॉर्निंग वॉक, व्यायाम व बैठक व्यवस्था
जागेची स्वच्छता, नेट लावून सुशोभिकरण, वृक्षलागवड व बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आल्याने ही जागा आता नागरिकांकरिता मॉर्निंग वॉक, व्यायामसाठी महत्वपूर्ण ठरते आहे. काही दिवसापूर्वी या जागेच्या आसपास व परिसरात माँर्निंग वॉकसाठी नागरिकांची इच्छा राहत नव्हती त्या जागेवर आता माँर्निंग वॉक सुरू झाली आहे. या ठिकाणी येवून तरूण व्यायाम करीत आहेत. तसेच या ठिकाणापासून दौड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तसेच या ठिकाणी सकाळी नागरिक येवून बैठक व्यवस्थेचा लाभ घेत आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची काळजी
उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्यासाठी पुढाकर घेतल्यानंतर आता गामपंचायतने गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करून योजनांच्या अवतीभवती असलेला घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. काही दिवसापूर्वीच जिल्ह्याच्या चमूने विरली येथे जावून उघडया हागणदारीच्या जागेची पहाणी केली होती. त्यानंतर या जागेची स्वच्छता व सुशोभिकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले होते. तेव्हाची पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याबाबत विनंती केली होती. सरपंच भेंडारकर यांनी पुढाकार घेवून स्त्रोतांची स्वच्छता घेण्यासाठी कंबर कसली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची प्लेटफार्म फुटलेले दुरूस्तीकरणे, अवती भवती साचत असलेल्या पाण्याच्या व्यवस्थापक करणे, बोअरवेल, विहीरीजवळ साचून असलेले घनकचºयाचे व्यवस्थापन करणे, सांडपाण्याचा निचरा करून स्त्रोतांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामपंचायतने पुढाकार घेवून पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.