माॅर्फ केलेले फोटो व्हायरल, पोलिसांनी काढला चार महिन्यांचा सीडीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:21+5:302021-04-13T04:12:21+5:30

अमरावती : मैत्रिण म्हणून फेसबुक व इन्स्टाग्रामवर चॅटिंग केले. त्यानंतर पुरुष आरोपीने २६ वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो मॉर्फ ...

The morphed photo went viral, police took a four-month CDR | माॅर्फ केलेले फोटो व्हायरल, पोलिसांनी काढला चार महिन्यांचा सीडीआर

माॅर्फ केलेले फोटो व्हायरल, पोलिसांनी काढला चार महिन्यांचा सीडीआर

Next

अमरावती : मैत्रिण म्हणून फेसबुक व इन्स्टाग्रामवर चॅटिंग केले. त्यानंतर पुरुष आरोपीने २६ वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो मॉर्फ करून ते तिच्या फ्रेन्डसलिस्टमध्ये व्हायरल केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी ग्रामीण सायबर सेलच्या पोलिसांनी पीडित महिला व आरोपींमध्ये झालेल्या कॉलचा चार महिन्यांचा सीडीआर काढला आहे. तसेच याप्रकरणी सोमवारी महिलेचे बयाणसुद्धा नोंदविण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.

आरोपीने पीडितीच्या मैत्रिणीच्या नावे फेक इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा तयार केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सदर महिलेने सहा ते सात वर्षांपूर्वी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती गत दोन महिन्यांपासून ॲक्टिव्ह होती. याचाच फायदा आरोपीने घेऊन आधी फेसबुकवर नंतर इन्स्टाग्रामवर महिलेशी चॅटिंग केले. त्याचे स्क्रिनशॉटसुद्धा पोलिसांनी तपासाकरिता घेतले आहे. त्यानंतर आपण मैत्रिणीशी नव्हे तर पुरुषाची चॅटिंग करीत असल्याचे कळल्यावर तिने चॅटिंग बंद केली. मात्र आरोपीने तिच्याशी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करून तिला पुन्हा प्रेमजाळात ओढले व तिला ब्लॅकोलिंग करून पैशाची मागणी करून लागला तिने पैसे दिले नाही म्हणून त्याने तिचे अश्लील फोटो मॉर्फ करून तिच्या फ्रेन्डसलिस्टमध्ये असलेल्या ३५ लोकांना व्हायरल केले. त्यानंतर तिने पोलिसात धाव घेतली. सदर चॅटींग व फोनवर बोलणे हे अकोला जिल्ह्यातील तिचे माहेर असलेल्या एका तालुक्यात झाल्याने पोलीस हा तपास अकोला जिल्ह्यात वर्ग करणारा होते. मात्र, महिला अमरावती जिल्ह्यातील असून काही चॅटिंग हे अमरावती जिल्ह्यातसुद्धा झाल्याने अमरावती पोलिसांनीच गुन्हा दाखल करून याप्रकरणी तपासाचा निर्णय घेतला. सदर महिला सोमवारी तिच्या भावासोबत ग्रामीण सायबर पोलिसांकडे आली. यावेळी पोलिसांनी तिचे बयाण नोंदवून तिच्याकडील काही महत्वाचे व्हिडीओ क्लिप तपासाकरिता ताब्यात घेतल्याची माहिती आहे. जानेवारी ते १० एप्रिलपर्यंतच्या कॉल डिडेल्सचा सीडीआर पोलिसांनी काढला. वारंवार वेगवेगळ्या तारखांना महिला व आरोपींनी ऐकामेकांशी संपर्क साधल्याचे यावेळी निदर्शनास आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलची टीम करीत आहे.

बॉक्स:

खासगी अवयव दाखव अन्यथा नवऱ्याला मारून टाकेन

या घटनेतील आरोपी हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील असून, तो दवाखान्यात काम करतो, असे त्याने सदर महिलेला सांगितले होते. मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणून त्याने महिलेला मोबाईल क्रमांक मागितला. तिने नकार दिला असता, त्याने हाताची नस कापून त्याचा फोटो महिलेला पाठविला. तू माझ्याशी फोनवर बोल. व्हिडीओ कॉल कर व तुझे खासगी अवयव दाखव, अन्यथा तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकी दिल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही तर व्हिडीओ कॉल व फोन कॉलचे रेकॉर्डिंग तिच्या मैत्रिणीला पाठविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांसमोर आव्हान ठरले असून, याचा टेक्निकल तपास होणे गरजेचे आहे.

कोट

याप्रकरणी महिलेचे बयाण नोंदविले. तपासाच्या दृष्टीने काही फोटो जप्त केले. या प्रकरणाचा टेक्निकल तपास सुरू आहे. लवकरच हा गुन्हा उघडकीस आणू.

- तपन कोल्हे, प्रभारी पोलीस निरीक्षक सायबर सेल

Web Title: The morphed photo went viral, police took a four-month CDR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.