मोर्शीत पाणी समस्या बिकट, काँग्रेसचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:36 PM2018-02-02T23:36:08+5:302018-02-02T23:36:29+5:30
शहरात पाणीसमस्या बिकट झाली आहे. मात्र, नगर परिषद केवळ भूलथापा देत आहे.
आॅनलाईन लोकमत
मोर्शी : शहरात पाणीसमस्या बिकट झाली आहे. मात्र, नगर परिषद केवळ भूलथापा देत आहे. समस्येवर समाधान करता येत नसल्याने अखेर मोर्शी शहर काँग्रेस कमेटीने वाढीव पाणीपुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी करीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आंदोलन केले.
मोर्शी शहरापासून हाकेच्या अंतरावरील अप्पर वर्धा धरणात शंभर टक्के जलसाठा असताना, मोर्शी शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. येथील पाणीसमस्या सोडविण्याकरिता मोर्शी नगर परिषदेने नव्या जलशुद्धीकरण व पाण्याच्या टाकीचे बांधकाम सन २०११ पासुन सुरू केले. परंतु, याबाबत येथील नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडून पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. यामुळे जनतेची दिशाभूल झाली असल्याचा आरोप करीत काँग्रेस व युवक काँग्रेस मोर्शीच्यावतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनी नगर परिषदेतील भाजप नगरसेवकांच्या राजकारणामुळे बांधकाम पूर्णत्वास येत नसल्याचा आरोप केला. यावेळी रवि हिरूळकर, नितीन उमाळे, सागर ठाकरे, नितीन पन्नासे, योगेश गणेश्वर, प्रीती देशमुख, लता परतेती, साधना साठवणे, प्रदीप कुºहाडे, रवींद्र गुल्हाने, नीलेश महल्ले, आनंद घोगडे, रेश्मा नितीन उमाळे, विजय कोकाटे, मंगेश चवडे, वसीम कुरेशी, अ. नईम, प्रभाकर जवंजाळ, कमलेश बरडे, नितीन ठाकरे, अभिजित साऊत, मोरेश्वर गुळधे आदी उपस्थित होते.