लाॅकडाऊन विरोधात मोर्शी येथील व्यापारी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:36+5:302021-04-16T04:12:36+5:30

मोर्शी : व्यापाऱ्यांच्या जिवंत राहण्याची अगोदर सरकारने तरतूद करावी करावी व नंतर लॉकडाऊन लावावा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोर्शी येथील ...

Morshi trade union warns of agitation against lockdown | लाॅकडाऊन विरोधात मोर्शी येथील व्यापारी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

लाॅकडाऊन विरोधात मोर्शी येथील व्यापारी संघटनेने दिला आंदोलनाचा इशारा

Next

मोर्शी : व्यापाऱ्यांच्या जिवंत राहण्याची अगोदर सरकारने तरतूद करावी करावी व नंतर लॉकडाऊन लावावा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोर्शी येथील व्यापारी संघटनेचे आशिष टाकोडे यांनी व्यक्त केली. याप्रकरणी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले जात असताना लॉकडाऊन पाहिजे म्हणणारे जे दोन-तीन टक्के लोक आहेत, ते नक्कीच सरकारी कर्मचारी आहेत. या सर्वांचा पगार बंद करून तो पैसा सर्वसामान्य जनतेच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा. सर्वसामान्य जनतेचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा. नियम कितीही कठोर असू द्या, लोक त्यांचे पालन करतील. पण, लॉकडाऊन करण्यात येऊ नये, अशी मागणी नवल अग्रवाल,संदीप साबळे, दीपक समर्थ, सचिन डवले,रुपेश पिंजरकर, संदीप पुसलेकर, अंकुश उगले, गजानन कराळे, पंकज खरबकर,भूषण साबळे, मंगेश खैरकर, प्रशांत पाटील, मधुसूदन ठाकरे, प्रदीप इंगळे , उल्हास पवार, प्रफुल याउल, साखेत खटुले, जगदीश तिवारी यांनी केली आहे.

Web Title: Morshi trade union warns of agitation against lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.