मोर्शीकरांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, अप्पर वर्धा 78 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 05:00 AM2021-09-03T05:00:00+5:302021-09-03T05:00:58+5:30

राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.

Morshikars still waiting for rains, Upper Wardha 78 per cent | मोर्शीकरांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, अप्पर वर्धा 78 टक्के

मोर्शीकरांना अद्याप पावसाची प्रतीक्षा, अप्पर वर्धा 78 टक्के

Next

अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : विदर्भातील सर्वांत मोठ्या अप्पर वर्धा धरणात २ सप्टेंबर रोजी ७८ टक्के जलसंचय झाला आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळल्यास धरण १०० टक्के भरून सर्व १३ दरवाजे उघडू शकतात. या नयनरम्य दृश्याची पर्यटकांना प्रतीक्षा आहे आणि हा योग आतापर्यंत जुळून न आल्याने त्यांचा हिरमोडदेखील झाला आहे. 
राज्यात पावसाने जोर धरला असून मुंबई-नाशिकसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अगदी जिल्ह्याच्या काही भागात पूरप्रवण स्थिती आहे. परंतु मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस कोसळल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला आहे.
शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० मीटर एवढी आहे. २ सप्टेंबर २०२१ पर्यंत या धरणामध्ये ३४१.१०   मीटर पाणी असून, या  धरणामध्ये सध्या ७८ टक्केच पाणीसाठा आहे. धरणामध्ये ४३४.४१ दलघमी पाणीसाठा आहे. 
जुलै-ऑगस्ट हे दोन महिने पावसाचे महत्त्वाचे महिने म्हणून समजले जाते. याच महिन्यात अप्पर वर्धा धरण पूर्ण भरेल, अशी शक्यता असते. परंतु, जुलै महिना पूर्णतः कोरडा गेला. गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. परंतु, अप्पर वर्धा धरण  क्षेत्रामध्ये पाहिजे तसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याचा येवा कमी झालेला आहे. 

चार दिवसांपासून पाऊस
जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुठले धरण शंभर टक्के भरले, कोणते धरण ओव्हरफ्लो झाले, हे पाहण्याची नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे. यासंदर्भात अनेकजण फोनद्वारा विचारत आहेत.

गतवर्षी २ सप्टेंबरला ९२ टक्के जलसाठा
 धरण क्षेत्रामध्ये आजपर्यंत एकूण ५४५ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गतवर्षी याच तारखेला अप्पर वर्धा धरण ९२ टक्के  भरले होते. त्यामुळे नागरिक, विशेषत: पवसाळी पर्यटनासाठी दुचाकी काढताच अप्पर वर्धा गाठणारे या धरणाकडे टक लावून बसले आहेत. 

 

Web Title: Morshikars still waiting for rains, Upper Wardha 78 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.