मोर्शीत डीजे व्यावसायिकांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:51 PM2018-10-16T21:51:44+5:302018-10-16T21:52:01+5:30
डी.जे. साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर लादण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : डी.जे. साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर लादण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशाने डी.जे.साऊंड सर्व्हिस व साऊंड बँड पथकावर बंदी लादण्यात आली. या बंदीमुळे वरूड, मोर्शी तालुक्यात व्यावसायिक व त्यांच्या अधिनस्थ कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बंदी उठविण्यासाठी राज्य शासनाने बँड पथकाची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडावी तसेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर वैयक्तिक स्तरावर बंदीवर तोडगा काढण्यात यावा, असे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकरिता देण्यात आले.
वरूड, मोर्शी तालुक्यातील डी.जे. बँड पथकांवर निर्बंध आणि बाहेरून येणाºया बँड पथकांना मोकळीक असेल, तर याविरुद्ध मी स्थानिक डी.जे.पथक व बँड पथकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे विक्रम ठाकरे म्हणाले.
आंदोलनात शिवदास गायकवाड, संजय नागले, वासुदेवराव तायवाडे, अनिल कांबळे, प्रवीण इंगळे, राहुल इंगळे, अविनाश फुटाणे, प्रफुल बरडे, प्रवीण काळे, पवन खेरडे, हनुमंत शेळके, मुन्ना इंगोले, राहुल फुटाणे, लक्ष्मण उघडे, कृणाल टाकरखेडे, मयूर फुटाणे, विपुल सुपले, अक्षय सावरकर, सुशील अकर्ते तसेच वरूड-मोर्शी तालुक्यातील सर्व डी.जे.पथक व बँड पथकांचे मालक, कामगार उपस्थित होते.
खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष मोरेश्वर गुडधे, मोर्शी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज इंगोले, उपाध्यक्ष विक्रम राऊत, महासचिव नीलेश लायदे, गोपाल सोरगे, संजय आखरे, वरूड न.प.चे नगरसेवक धनंजय बोकडे, मोर्शी न.प.चे नगरसेवक नितीन उमाळे, नितीन पन्नासे, सागर ठाकरे, राजू साठवणे, सुरेंद्र परतेकी, रीतेश भुयार तसेच युवा सेना पदाधिकारी अंकुश राऊत, भूषण राऊत यांनीसुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला.