एमओंचे ‘ते’ आरोप तथ्यहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:53+5:302021-06-29T04:09:53+5:30

चिखलदरा : तालुक्यातील डोमा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकांनी कोविड सेंटरसंबंधी आरोप फेटाळले आहेत. मुख्याध्यापिकेने दिलेल्या ...

MO's 'they' allegations are baseless | एमओंचे ‘ते’ आरोप तथ्यहीन

एमओंचे ‘ते’ आरोप तथ्यहीन

Next

चिखलदरा : तालुक्यातील डोमा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकांनी कोविड सेंटरसंबंधी आरोप फेटाळले आहेत.

मुख्याध्यापिकेने दिलेल्या निवेदनानुसार, शाळेत मार्च ते एप्रिल २०२० मध्ये कोविड सेंटर होते तेव्हा ३९ व्यक्ती विलगीकरण सेंटरला दाखल होते. त्यावेळी काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. माहुलकर यांनी सहकार्याबाबत आभार मानले होते. २०२१ मध्ये १ जून रोजी पुन्हा कोविड सेंटर देऊन काटकुंभ येथील डॉ. स्वाती राठौर यांची नियुक्ती झाली. त्यांनी निवास व्यवस्था मागितली तेव्हा त्यांना कोविड सेंटरनजीक रूम घ्या, असे सांगितले. परंतु, त्यांनी व्हीआयपी सुविधेचा अट्टहास धरला व शाळा कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन केले. पाणी व प्रकाश व्यवस्थेविषयी त्यांची कायम तक्रार होती. वास्तविक, विजेची समस्या कायम असल्याने थ्री-फेज मोटरवर पाण्याच्या टाक्या भरत नाही वा इन्व्हर्टर चार्ज होत नाही. मीसुद्धा आठ ते दहा दिवस हातपंपाने पाणी आणले होते, अशी पुस्ती मुख्याध्यापिकांनी जोडली.

Web Title: MO's 'they' allegations are baseless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.