झाल्या रे दादा, खाकीतील ‘मोस्ट अवेटेड पोस्टिंग’; अमरावती शहर पोलीस दलात खांदेपालट

By प्रदीप भाकरे | Published: May 31, 2023 01:17 PM2023-05-31T13:17:35+5:302023-05-31T13:17:51+5:30

सीपींच्या आदेशाची होईल का अंमलबजावणी

Most Awaited Posting in Amravati city police force started; officers in July | झाल्या रे दादा, खाकीतील ‘मोस्ट अवेटेड पोस्टिंग’; अमरावती शहर पोलीस दलात खांदेपालट

झाल्या रे दादा, खाकीतील ‘मोस्ट अवेटेड पोस्टिंग’; अमरावती शहर पोलीस दलात खांदेपालट

googlenewsNext

अमरावती : शहर पोलीस दलातील १४ पोलीस अंमलदारांच्या मुदतपुर्व बदल्यांसह २३६ अंमलदारांच्या नियमित बदल्यांवर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी ३० मे रोजी शिक्कामोर्तब केले. बदलीप्राप्त २५० अंमलदारांना आदेश प्राप्त होताच संबंधितांनी तात्काळ कार्यमुक्त करावे, असेही सीपींनी स्पष्ट केले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांचा पुर्वानुभव पाहता यातील अनेक जण बदलीस्थळी न जाता आपआपल्या गॉडफादरकरवी ड्युटी पासचा सोईस्कर पर्याय चाचपडून पाहत आहेत.

गतवर्षी तत्कालिन आयुक्तांनी केलेली बदली टाळून सुमारे ५० पेक्षा अधिक अंमलदारांनी त्या आदेशाची पायमल्ली चालविली आहे. त्यामुळे ३० मे रोजीच्या आदेशानुसार किती अंमलदार नवीन बदलीच्या ठिकाणी तत्काळ जातात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, गुन्हे शाखेतील संजय वानखडे, मोहम्मद सुलतान व निलेश पाटील यांची बदली अनुक्रमे राजापेठ, सायबर व नांदगाव पेठमध्ये झाली आहे. गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे हे त्यांना कार्यमुक्त करतात की कसे, याकडे खाकीचे लक्ष लागले आहे. तर राजापेठ मध्ये कार्यरत सर्वाधिक तीन अंमलदारांची विशेष शाखेसह गुन्हे शाखेतही वर्णी लागली आहे. राजापेठमधील राजेश राठोड, विकास गुडधे व अतुल संभे यांच्यासह गाडगेनगरमधील जहिरोद्दीन शेख व बडनेरातील चेतन कराळे यांची क्राईममध्ये एन्ट्री झाली आहे.

१४ अंमलदारांच्या मुदतपूर्व बदल्या

जलद प्रतिसाद पथक, बडनेरा, फ्रेजरपुरा, गाडगेनगर, कोतवाली, वाहतूक, राजापेठ पोलीस ठाण्यात कार्यरत १४ पोलीस अंमलदारांची प्रशासकीय कारणास्तव मुदतपुर्व बदल्या करण्यात आल्या. यात अ. रहीम अ. कदीर व इशय खांडे या बडनेरा येथे कार्यरत दोन अंमलदारांची अनुक्रमे पोलीस मुख्यालय व वलगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्या दोघांव्यतिरिक्त या यादीत शुभम कडुकार, सागर चव्हान, पवन जयपुरे, आकाश पवार, प्रशांत बिहाडे, अक्षय देशमुख, योगेश गावंडे, विनायक रामटेके, सतीश देशमुख, निलेश जुनघरे, सुधीर कवाडे व नंदिनी वरठे यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांची पोस्टिंग जुलैत!
दरम्यान, राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांस ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे डीजी लेवलवरून होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आयुक्तालयातून नेमकी कुणाची बदली होते, तर कुणाची पदस्थापना अमरावती शहरात होते, ते स्पष्ट होईल. त्यानंतरच शहर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांची अंतर्गत पदस्थापना होईल.

Web Title: Most Awaited Posting in Amravati city police force started; officers in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस