सर्वाधिक हिंदू-मुस्लिम लोकसंख्या अचलपूर तालुक्यात
By Admin | Published: August 31, 2015 12:08 AM2015-08-31T00:08:31+5:302015-08-31T00:08:31+5:30
जिल्ह्यात अमरावती महापालिका क्षेत्र वगळता सर्वाधिक २ लाख ७९ हजार ४७९ लोकसंख्या अचलपूर तालुक्याची आहे.
गजानन मोहोड अमरावती
जिल्ह्यात अमरावती महापालिका क्षेत्र वगळता सर्वाधिक २ लाख ७९ हजार ४७९ लोकसंख्या अचलपूर तालुक्याची आहे. धर्मनिहाय जनगणनेत जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, जैन व ख्रिश्चन समाजाची सर्वाधिक लोकसंख्या अचलपूर तालुक्यात आहे, तर बौद्ध समाजाची सर्वाधिक लोकसंख्या दर्यापूर तालुक्यात आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २८ लाख ८८ हजार ४४५ एवढी आहे. यामध्ये अमरावती महापालिकेच्या हद्दीमध्ये ६ लाख ४७ हजार ५७ लोकसंख्या आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असणाऱ्या १४ तालुक्यांपैकी सर्वाधिक लोकसंख्या अचलपूर तालुक्याची आहे. धारणी तालुक्याची लोकसंख्या १ लाख ८४ हजार ६६५ आहे यामध्ये ९३ हजार ८९८ पुरुष व ९० हजार ६७६ महिला आहेत.
चिखलदरा तालुक्याची १ लाख १८ हजार ८१५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६० हजार ७२३ पुरुष व ५८ हजार ९२ महिलांची लोकसंख्या आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात १ लाख ६० हजार ९०३ लोकसंख्या आहे. यामध्ये ८२ हजार ६७९ पुरुष व ७८ हजार २२४ महिला आहेत.
चांदूरबाजार तालुक्यात १ लाख ९६ हजार २५८ लोकसंख्या आहे. यामध्ये १ लाख ७२९ पुरुष व ९५ हजार ५२९ महिला आहेत. मोर्शी तालुक्यातील १ लाख ८२ हजार ४८४ लोकसंख्या आहे. यात ९३ हजार ७८३ पुरुष व ८८ हजार ७०१ महिलांची लोकसंख्या आहे.
चांदूररेल्वे तालुका लाखाच्या आत
अमरावती : वरुड तालुक्यात २ लाख २४ हजार ९८४ लोकसंख्या आहे. यामध्ये १ लाख १५ हजार ६८७ पुरुष व १ लाख ९ हजार २९७ महिला आहे व तिवसा तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४ हजार ७२८ आहे. यात ५३ हजार ८११ पुरुष व ५० हजार ९१७ महिला आहेत. अमरावती तालुक्याची लोकसंख्या १ लाख ४१ हजार २७० आहे. यामध्ये ७३ २३४ पुरुष व ६८ हजार ३६ महिलांची लोकसंख्या आहे. भातकुली तालुक्यात १ लाख १३ हजार १०९ लोकसंख्या आहे. यात ५८ हजार १५ पुरुष व ५५ हजार ९४ महिलांची संख्या आहे. दर्यापूर तालुक्याची लोकसंख्या १ लाख ७५ हजार ६१ ऐवढी आहे यामध्ये ८९ हजार ६८० पुरुष व ८५ हजार ३८१ महिला आहेत. नांदगाव तालुक्यात १ लाख २९ हजार ८१० लोकसंख्या आहे. यामध्ये ६६ हजार ६६१ पुरुष व ६३ हजार १४९ महिला आहेत. धामणगाव तालुक्यात १ लाख ३२ हजार ९१५ लोकसंख्या आहे. यामध्ये ६८ हजार २८३ पुरुष व ६४ हजार ६३२ महिला आहेत.