सर्वाधिक मोबाईल चोरी सार्वजनिक ठिकाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:45+5:30

गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे.

Most Mobile Theft In Public! | सर्वाधिक मोबाईल चोरी सार्वजनिक ठिकाणी !

सर्वाधिक मोबाईल चोरी सार्वजनिक ठिकाणी !

Next
ठळक मुद्देशहरात १८८३ ‘मिसिंग’ : तक्रार नोंदविण्यास अनेकांची टाळाटाळ

संदीप मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोबाइल चोरी गेल्याची तक्रार भादंविच्या कलम ३७९ अन्वये दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, सायबर पोलीस मोबाइल हरविल्याची तक्रार घेऊन तांत्रिक तपासात धन्यता मानत आहेत. त्यामुळे गतवर्षी तब्बल १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या, तर त्यापैकी ३१४ संचांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गर्दीच्या सार्वजनिक मोबाइलचोरांपासून सावध राहा, असे आवाहन करण्यास मात्र हा विभाग विसरत नाही.

गतवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर दरम्यान १८८३ मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी शोध लागलेले ३१४ मोबाइलच सापडलेले आहेत. त्याची २५ लाख १३ हजार १०० रुपये रक्कम आहे. २०१८ मध्ये १ एप्रिल ते ३१ डिसेंबर दरम्यान ७२० मोबाइल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ४२३ मोबाइलचा शोध पोलिसांनी लावला. हा मुद्देमाल ४३ लाख १० हजार ३०९ रुपयांचा आहे. तक्रारकर्ते ठाण्याच्या पायऱ्या झिजवितात. पण, ‘चोरी’ आणि ‘गहाळ’च्या चक्रात त्याची येरझारा करण्यातच दमछाक होते.

महिनाभरात पोलिसांनी शोधले १०७ मोबाइल
पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून राबविलेल्या मोहिमेत महिनाभरात पोलिसांनी विविध ठाण्यांच्या हद्दीतून आरोपींकडून १०७ हरविलेल्या मोबाइलचा शोध घेतला. त्याची रक्कम १० लाख एवढी आहे.मोबाइल शोधण्याकरिता सायबर पोलीस ठाण्यात दोन पथके स्थापन केली आहेत.

मोबाइल लंपास; मात्र तक्रार हरविल्याची
अनेकदा मोबाइल चोरीला जातो किंवा खिशातून किंवा पर्समधून अलगद काढून घेतला जातो. अनेकदा चोरीचा गुन्हा तातडीने दाखल करीत नाही. त्यामुळे चोरी झाली असतानाही तक्रारदाराकडूनच मोबाइल हरविल्याची तक्रार लिहून घेतली जाते. परिणामी मोबाइल चोरल्याचे गुन्हे कमी व हरविलेल्याची प्रकरणे जास्त आहेत. मोबाइलचे लोकेशन इतर राज्यात दाखवित असेल, तर पोलीसदेखील फारसा रस घेत नाहीत.

मोबाइलचोरीच्या ११ गुन्ह्यांतील १६ संच शोधले
विविध ठाण्यांच्या हद्दीत मोबाइलचोरीच्या ११ दाखल गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांकडे आला होता. त्यांनी त्याचा तांत्रिक तपास करून ११ गुन्ह्यांतील १६ मोबाइल आरोपींकडून जप्त केले. यासंदर्भात पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

येथून चोरी होण्याचा सर्वाधिक धोका
बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा-महाविद्यालये, परीक्षा केंद्र, बँक, बसच्या गर्दीत तसेच मुख्य चौकांत सार्वजनिक ठिकाणी मोबाइल गहाळ होण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. मात्र, याकडे नागरिकांचे दुर्लक्ष असते. संपर्काचे माध्यम व त्यामुळेच दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याने आपल्याकडील मोबाइलबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे.

वर्षभरात १८८३ मोबाइल हरविल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. पैकी ३१४ मोबाईलचा शोध लावून ते नागरिकांना परत केले. चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपास संबंधित पोलीस ठाण्यात सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या आमचे सहकार्य असते. इतर तक्रारींचा तपास सुरू आहे.
- प्रवीण काळे
पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन

सर्तकता बाळगा
उघड्यावर मोबाइल चार्जिंगला ठेवू नका. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला तो देऊ नका. वरच्या खिशात ठेवू नका. पर्समध्ये मोबाइल ठेवून बस, ट्रेन किंवा गर्दीच्या ठिकाणी वावरताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Web Title: Most Mobile Theft In Public!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल