मंगरुळ चव्हाळ्यात सर्वाधिक मतदार

By admin | Published: January 28, 2017 12:25 AM2017-01-28T00:25:54+5:302017-01-28T00:25:54+5:30

तालुक्यात ८ पं.स गण व ४ जि.प. गटाचा समावेश असून यात एकूण ९५ हजार ५९६ मतदार आहेत.

Most voters in the March cycle | मंगरुळ चव्हाळ्यात सर्वाधिक मतदार

मंगरुळ चव्हाळ्यात सर्वाधिक मतदार

Next

पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांच्या वाऱ्या : नांदगाव तालुक्यात ९५ हजार मतदार
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात ८ पं.स गण व ४ जि.प. गटाचा समावेश असून यात एकूण ९५ हजार ५९६ मतदार आहेत. प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारानी पक्षश्रेष्ठींकडे मनधरणी सुरु केली आहे.
लोणी गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून यात लोणी, फुलआमला, दाभा, दहीगाव, टाकळी बु. पाळा, बेलोरा हिरापूर ग्रापंचा समावेश आहे. येथे ११ हजार ५६१ मतदार आहेत. धानोरा (फसी) गण सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव असून यात धानोरा फसी, सार्सी, वाटपूर, वढुरा, सिद्धनाथपूर, शेलुगुंड, हिवरा बु., ढवळसरी ग्रापंचा समावेश आहे. यात १० हजार ९९३ मतदार आहे. जनुना गण नामाप्र स्त्रियांसाठी राखीव असून यात जनुना, जळू, जामगाव, जावरा, खिरसाना, सावनेर, कोठोळा, भगुरा, माहुली चोर ग्रापंचा समावेश आहे. यात ११ हजार ६२९ मतदार आहेत. फुबगाव गण हा नामाप्रसाठी राखीव असून यात फुबगाव, वाघोडा, म्हसला, सातरगाव, कंझरा, येणस, एरंडगाव, अडगाव बुचा समावेश आहे. यात ११ हजार ४८३ मतदार आहे.
धानोरा (गुरव) गण अनुसूचित जाती स्त्रिसाठी राखीव असून यात धानोरा गुरव, शिरपूर, मोखड, नांदसावंगी, रोहणा, पिंपळगाव बैनाई, कोदोरी, खंडाळा खुर्द, पहूर, कणी मिर्झापूर, एकलासपूर, पळसमंडळ या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राचा समावेश आहे. यात १२ हजार ६७६ मतदार आहे. मंगरूळ चव्हाळा पं.स. गण अनुसूचित जातीसाठी राखीव असून यात मंगरुळ चव्हाळा, चिखली वैद्य, शिवणी, धानोरा शिक्रा, येवती, धामक, बेलोरा, शेलूनटवा, सुलतानपूरचा समावेश आहे. यात १३ हजार १७५ मतदार आहे.
वाढोणा रामनाथ पं.स. गण सर्वसाधारण स्त्रियासाठी राखीव असून यात वाढोणा, पापळ, कोव्हाळा जटेश्वर, लोहगाव, पिंप्री निपाणी, सारखरा, काजना ग्रापंचा समावेश आहे. यात १२ हजार ३९३ मतदार आहे. सालोड गण सर्वसाधारणकरिता असून यात सालड, खानापूर, वेणी गणेशपूर, शिवरा, पिंपळगाव निपाणी, खेड पिंप्री, पिंप्री गावंडा, पुसनेर, वडाळा या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राचा समावेश आहे. यात ११ हजार ६८६ मतदार आहे.
लोणी जि. प. गट सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखी असून यात लोणी व धानोरा फसी पं.स. गणातील ग्रापंक्षेत्राचा समावेश आहे. यात २२ हजार ५५४ मतदार आहेत. फुबगाव गट सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव असून यात जनुना व फुबगाव पं.स. गणातील ग्रापंचा समावेश आहे. यात २३ हजार ११२ मतदार आहेत.
मंगरुळ चव्हाळा गट अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव असून यात धानोरा गुरव व मंगरूळ चव्हाळा पं.स. गणातील ग्रापंचा समावेश आहे. यात २५ हजार ८५१ मतदार आहे. वाढोणा रामनाथ गट अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी राखीव असून यात वाढोणा व सालोड गणातील ग्रामपंचायतींच्या क्षेत्राचा समावेश आहे. यात २४ हजार ७९ मतदार आहेत. उपरोक्त आकेडवारीनुसार मंगरूळ चव्हाळा गटात सर्वाधिक मतदार आहेत. हे मतदार निर्णायक ठरू शकतात. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Most voters in the March cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.