देवी रुक्मिणीच्या माहेरी जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:55 PM2018-07-28T22:55:55+5:302018-07-28T22:57:18+5:30
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भा$ची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. सुमारे २० हजार भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली.
ठळक मुद्देकौंडण्यपूरला पाडव्याची दहीहांडीपंढरपूरहून परतलेल्या पायदळ दिंडीचे जल्लोषात स्वागत२० हजारांवर भाविकांची उपस्थिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्ककौंडण्यपूर : ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..’च्या गजराने विदर्भा$ची पंढरी आणि रुक्मिणीचे माहेरघर तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर दुमदुमले. सुमारे २० हजार भाविकांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली.
कौंडण्यपूर येथे पंढरपूरहून परतलेल्या पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर, सचिव सदानंद साधू, विश्वस्त अतुल ठाकरे, व्यवस्थापक काळे यांनी केले. नंतर वारकºयांनी महाप्रसाद घेतला. पाडव्याला आषाढी एकादशीची समाप्ती व दहीहंडी असल्याने भाविक पहाटेपासून दाखल झाले. वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या मंदिरात दिवसभर रुक्मिणीचे दर्शनासाठी रांग लागली. यात महिला मंडळीचा संख्या अधिक होती. देवस्थान संस्थानने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली होती, तर ठाणेदार सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
सायंकाळच्या दहीहंडीसाठी थांबलेल्या भाविकांनी दिवसभर प्रवचनाचा लाभ घेतला तसेच काही हौशींनी वर्धा नदीत नौकाविहार केला. दुपारी २ ते ४ या वेळेत हभप सर्जेराव देशमुख महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. यानंतर दहीहंडीसाठी भाविक गोकुळपुरीत दहीहंडी स्थळी आले.
दहीहंडीचे पूजन व दही तीर्थाचे भाविकांना वाटप करून सायंकाळी ५.३० वाजता रीतसर सुरुवात झाली. दहीहंडीचे पूजन सर्जेराव देशमुख महाराज व अतुल ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नामदेव अमाळकर, सदानंद साधू, पंचायत समितीचे माजी सभापती विलास माहोरे व इतर सन्माननीय व्यक्ती उपस्थित होत्या. दहीहंडी सोहळा झाल्यावर भाविक आपआपल्या गावी जाण्यास निघाले.
विठुरायाला रुक्मिणीच्या माहेरचा अहेर
कौंडण्यपूर देवस्थानातून दरवर्षी रुक्मिणीमातेची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होताच संस्थानकडून भव्य स्वागत व देवी रुक्मिणीला आहेर अशी परंपरा आहे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पंढरपूरहून परत निघण्यापूर्वी श्रीक्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी संस्थानकडून रुक्मिणीच्या माहेरातील नैवेद्य पांडुरंगाला अर्पण करण्यात आला. संस्थानचे विश्वस्त अतुल ठाकरे, सुरेश चव्हाण, व्यवस्थापक काळे, वारकरी भोयर विठ्ठलाची पूजा केली. यावेळी पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त तसेच पालखीतील हभप अशोक महाराज, बबनराव इंगळे, विठ्ठल राठोड, आकाश ठाकरे, सुभाष अर्मळ, अनूप मेहकर, अंबादास जाधव, सुनील वेरुळकर ही मंडळीदेखील उपस्थित होती. यानंतर पालखी तेथून निघाली आणि पाडव्याच्या दहीहंडीला कौंडण्यपुरात दाखल झाली.