चारचाकी वाहनाचा टायर फुटला; सासू-सून ठार, मुलगा-जावई गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 10:07 AM2022-12-27T10:07:53+5:302022-12-27T10:10:53+5:30

चिमुकला सुखरूप, थिलोरी मार्गावर अपघात

Mother-in-law, daughter-in-law killed, son and son-in-law seriously injured in a accident as car tyre burst | चारचाकी वाहनाचा टायर फुटला; सासू-सून ठार, मुलगा-जावई गंभीर

चारचाकी वाहनाचा टायर फुटला; सासू-सून ठार, मुलगा-जावई गंभीर

googlenewsNext

दर्यापूर (अमरावती) : बडनेराहून भातकुली-दर्यापूर मार्गे अकोटला जाणाऱ्या चारचाकी वाहनाला सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास अपघात झाला. टायर फुटल्याने कोलांट्या खात हे वाहन रस्ता व शेताच्या मध्ये असलेल्या खड्ड्यात कलंडली. या अपघातात सासू व सून ठार झाले, तर दोघे अतिशय गंभीर झाले आहेत. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावानजीक हा अपघात घडला. यामध्ये सहावर्षीय चिमुकला सुखरूप वाचला. त्याला किरकोळ मार लागला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, रजिया सुलताना हफिजुल्ला खान (७०) व त्यांची सून सुलताना परवीन हसरतउल्ला खान (४५, दोघीही रा.जुनीवस्ती, बडनेरा असे अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. मुलगा हसरतउल्ला खान हफीजउल्ला खान (५२), जावई अफजल खान जब्बार खान (५८) व मुलीचा मुलगा जियान खान हिदायत खान (६) हे जखमी झाले. लग्नसोहळ्यात उपस्थित राहण्याकरिता बडनेराहून येथून अकोट तालुक्यात ते जात असताना, थिलोरी गावानजीक त्यांच्या चारचाकीचा पुढील टायर फुटला. यामुळे वेगात असलेले हे वाहन कोलांट्या खात रस्त्याच्या बाजूला शेताच्या नालीत कोसळले. यात सुलताना परवीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अमरावती येथे रेफर करण्यात आले.

नातेवाइकांच्या माहितीवरून अमरावतीत उपचारादरम्यान रजिया सुलताना यांचाही मृत्यू झाला. अपघात झाला, त्यावेळी शेतात काही शेतकरी होते. काही नागरिकांच्या मदतीने अपघातात जखमी झालेल्यांना बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिका बोलावून अपघातात जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुढील तपास दर्यापूर पोलिस करीत आहेत.

Web Title: Mother-in-law, daughter-in-law killed, son and son-in-law seriously injured in a accident as car tyre burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.