आईचे मुलाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:45 PM2018-06-09T22:45:17+5:302018-06-09T22:45:17+5:30

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दुसऱ्यांदा शनिवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. छाया दुर्गादास सोळंकी (४५, रा. बोरपेंड, जि. बैतुल) यांनी त्यांचा मुलगा शुभम (२२) याला किडनी दान केली.

Mother's child alive | आईचे मुलाला जीवदान

आईचे मुलाला जीवदान

Next
ठळक मुद्देसुपर स्पेशालिटीत दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दुसऱ्यांदा शनिवारी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. छाया दुर्गादास सोळंकी (४५, रा. बोरपेंड, जि. बैतुल) यांनी त्यांचा मुलगा शुभम (२२) याला किडनी दान केली.
सुपर स्पेशालिटीमध्ये ४ एप्रिल रोजी पहिले किडनी प्रत्यारोपण झाले होते. शनिवारी जीवनदान मिळालेला शुभम हा जिल्हा शल्य चिकीत्सक शामसुंदर निकम व विशेष कार्य अधिकारी टी.वी. भिलावेकर यांच्या मार्गदर्शनात नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी यांच्याकडे शुभम उपचार घेत होता.
किडनी ट्रान्सप्लांटविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केल्यानंतर तो व त्याचे कुटुंबीय तयार झाले. या शस्त्रक्रियेला राज्य प्राधिकार समिती, यवतमाळ येथील अधिष्ठाता मनीष श्रीगिरीवार, समिती अध्यक्ष स्नेहलता हिंंगचे, तत्कालीन आरोग्य उपसंचालक नितीन अंबाडेकर यांच्या समितीने मान्यता दिली. या शस्त्रक्रियेकरिता नागपूर येथील किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ संजय कोलते, बधिरीकरण तज्ज्ञ भाऊ राजूरकर यांची विशेष उपस्थिती होती. रुग्णालयातील तज्ज्ञ युरोसर्जन राहुल पोटोडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, राहुल घुले, नेफ्रोलॉजिस्ट अविनाश चौधरी, विक्रम कोकाटे, सौरभ लांडे, राजेश कस्तुरे, रामप्रसाद चव्हाण, प्रणित घोनमोडे, तसेच शस्त्रक्रिया विभागात ज्योती तायडे, मनीषा कांबळे, दुर्गा घोडीले, ज्योती काळे, रीतू बैस यांनी विविध जबाबदारी सांभाळली.
आयसीयू कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका
प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत आयसीयू कर्मचाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामध्ये माला सुरपाम, अधिसेविका ज्योती मोहोड, अलका मोहोड, भारती घुसे, जमुना मावस्कर, शुभांगी टिंगणे, ज्योती गोंडसे, सविता मेंढे यांच्यासह डॉ. अर्जना खाडे, पल्लवी गेडाम, अशोक किनवटकर, अमोल वाडेकर, विनोद पाटील, प्रफुल्ल निमकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Mother's child alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.