फिश मार्केटच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार
By admin | Published: January 2, 2016 08:29 AM2016-01-02T08:29:32+5:302016-01-02T08:29:32+5:30
राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, हैदराबाद व महानगरपालिका अमरावतीच्यावतीने बडनेरा व अमरावती येथे प्रत्येकी एक याप्रमाणे २६ कोटी रुपये खर्च करून फिश मार्केट उभारण्यात येणार आहे.
एकमत : बडनेरा, अमरावतीत होणार मार्केट, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन
अमरावती : राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, हैदराबाद व महानगरपालिका अमरावतीच्यावतीने बडनेरा व अमरावती येथे प्रत्येकी एक याप्रमाणे २६ कोटी रुपये खर्च करून फिश मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.
राष्ट्रीय महामंडळासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ हे दोन फिश मार्केट उभे करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करीत आहे. राज्य मत्स्य विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांनी अमरावती महानगरपालिकेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून कराराच्या कागदपत्रांचे हस्तांतरण केले. २६ कोटी रुपये खर्च करून फिश मार्केट तथा 'फिश हब' तयार केला जाणार आहे. परिसरातील मासेमारांना याचा लाभ होणार आहे. या 'हब'मध्ये मासे साठवणूक व निर्यात सुविधा उपलब्ध सामंजस्य कराराप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, गृहराज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खा.आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ.सुनिल देशमुख, रवी राणा, रमेश बुंदिले, डॉ.अनिल बोंडे, महापौर चरणजित कौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्य मत्स्य विकास महामंडळाचे प्रोजेक्ट मॅनेजर व्ही.एम.देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)