‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे गंडांतर

By admin | Published: June 22, 2017 12:15 AM2017-06-22T00:15:45+5:302017-06-22T00:15:45+5:30

मालमत्ताकर वसुलीत कुचराई करणाऱ्यांसह बदली टाळणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करुन आयुक्तांनी प्रशासकीय खाक्या दाखवला आहे.

Movement of action on 'those' employees | ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे गंडांतर

‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईचे गंडांतर

Next

आयुक्त आक्रमक : महापालिकेत खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मालमत्ताकर वसुलीत कुचराई करणाऱ्यांसह बदली टाळणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करुन आयुक्तांनी प्रशासकीय खाक्या दाखवला आहे. कुठल्याही परिस्थितीत प्रशासकीय बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांना दिला असून बदली टाळणाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.
बांधकाम विभागातील शुक्ला नामक लिपिकाचे तत्काळ निलंबन बदली टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी १९ जून रोजी पाच कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले. या आदेशाने बदली टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून आपल्यावरही ती कुऱ्हाड कोसळू शकते, अशी भीती त्यांना सतावते आहे. कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांचेकडून बदलीप्राप्त कर्मचारी व प्रत्यक्षात बदलीस्थळी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता, २१ व २७ एप्रिल २०१७ व त्यापूर्वी काढण्यात आलेल्या बदली आदेशातील अनेक कर्मचारी रुजू झाले नाही. मिसाळांकडून ती माहिती घेतल्यास व त्यावर आयुक्तांनी आदेश काढल्यास आणखी डझनभर कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

एप्रिलमधील बदली आदेश तपासावेत
एकाच ठिकाणी ठिय्या देणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी बनवून आयुक्तांनी ‘जंबो’ बदलीचे आदेश काढले होते. दोन दिवसांनी काही कर्मचारी सुधारित आदेशाच्या नावावर त्याच खुर्चीवर कायम राहिले. एप्रिलमधील त्या बदली आदेशाची पडताळणी प्रशासनाने करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Movement of action on 'those' employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.