बडनेऱ्यात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:10+5:302021-06-01T04:10:10+5:30
बड़नेरा : शहरातील बहुतांश भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने सोमवारी युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी पाण्याच्या ...
बड़नेरा : शहरातील बहुतांश भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने सोमवारी युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. आमच्या मागण्या तात्काळ मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
नव्या वस्तीच्या मिलचाळ, शारदानगर, शिवाजी फैल, हमालपुरा तसेच जुन्या वस्तीतील कंपासपुरासह इतर काही भागांत पाण्याची समस्या या परिसरातील नागरिकांचा मनस्ताप वाढवित आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. पाणी सोडण्याची नेमकी वेळ ठरलेली नाही. या मुद्द्यांच्या सोडवणुकीच्या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीचे सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर, प्रभाकर मेश्राम हे तिघे सोमवारी नव्या वस्तीतील पाण्याच्या टाकीवर चढले होते. आमच्या मागण्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मार्गी लावाव्या, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. एक महिन्यापूर्वीदेखील जुन्या वस्तीच्या जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर महिलांनी आंदोलन केले होते.
संपूर्ण बडनेरा शहरातच पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावणारी झाली आहे. जुन्या वस्तीच्या बऱ्याच भागातही पाण्याची समस्या आहे.