अंजनसिंगीत वृद्धांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:00 AM2020-11-21T05:00:00+5:302020-11-21T05:00:36+5:30
सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या नेतृत्वात पेंशनच्या मुद्द्यासह २१ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या उर्वरित मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कुऱ्हा-धामणगाव बस, परिसरातील पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामपंचायतीकडून अपंग निधी, वृद्ध पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे वय करण्याच्या मागणीचा समावेश होता. यावेळी बंदोबस्तासाठी कुऱ्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठाणेदार वर्गे यांच्या नेतृत्वात तैनात होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनसिंगी : येथील बसस्थानकापुढील राज्य मार्ग क्रमांक २३७ वर वृद्ध नागरिकांनी शुक्रवारी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या अभिनव आंदोलनाची धामणगाव रेल्वे तालुक्यात दिवसभर चर्चा होती.
सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे यांच्या नेतृत्वात पेंशनच्या मुद्द्यासह २१ सप्टेंबरच्या आंदोलनाच्या उर्वरित मागण्या करण्यात आल्या. यामध्ये कुऱ्हा-धामणगाव बस, परिसरातील पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामपंचायतीकडून अपंग निधी, वृद्ध पेन्शन योजनेसाठी ६० वर्षे वय करण्याच्या मागणीचा समावेश होता. यावेळी बंदोबस्तासाठी कुऱ्हा पोलीस ठाण्याचे कर्मचारी ठाणेदार वर्गे यांच्या नेतृत्वात तैनात होते. नायब तहसीलदार सयाम, भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक नाईक यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले व मागण्यांवर तातडीने विचार करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. आंदोलनामुळे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.