प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:20 PM2017-08-06T23:20:49+5:302017-08-06T23:21:56+5:30

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावतीच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

The movement of the Primary Teachers Association | प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा अमरावतीच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाकचेरीसमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षक संघाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे ५ आॅगस्ट रोजी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे दिलेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना रद्द करू न जुनी पेन्शन योजना लागू करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षक व शिक्षणाच्या समस्या निवारणासाठी राष्ट्रीय शिक्षक आयोगाची स्थापना करावी, शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांच्या शासन निर्णयात योग्य ती दुरूस्ती करावी, एमएससी आयटीसाठी शिक्षकांना मुदतवाढ देण्यात यावी, जिल्हा परिषद शाळेत लिपिक, सेवकांची नियुक्ती करावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
यावेळी आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामदास कडू, सरचिटणीस किरण पाटील, मार्गदर्शक अनिल देशमुख, कोषाध्यक्ष राजेंद्र होले, संगीता देव, महिला आघाडीच्या ज्योती उभाड, प्रमोद दखने, सुभाष सहारे, गजानन बोरोडे, शरद काळे, नीळकंठ यावले, प्रदीप खवले, चंदन खर्चान, अरूण देशमुख, गजानन चौधरी, नितीन देशमुख, महेश्र्वर पवार, चंद्रशेखर देशमुख, प्रशांत सव्वालाखे, दिलीप इंग़ळे, डी.आर साखरे, विद्या वकील, माधुरी कावळे, ओंकार राऊत विजय उभाड, राजेंद्र खोंडे आदींसह पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: The movement of the Primary Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.