राणांचे बाजार समितीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 11:54 PM2018-05-02T23:54:45+5:302018-05-02T23:55:06+5:30

नाफेडच्यावतीने बाजार समितीच्या यार्डात तूर व हरभऱ्याची मोजणी कासवगतीने करण्यात येत असल्याने व साडेसहा हजार शेतकऱ्यांना कूपन दिलेल्या मालाची अद्यापही मोजणी न झाल्याने आ. रवि राणा यांनी कार्यकर्त्यांसोबत बाजार समितीतील नाफेडच्या मोजणी केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत बुधवारी दुपारी दोन तास आंदोलन केले.

Movement in Rana's Market Committee | राणांचे बाजार समितीत आंदोलन

राणांचे बाजार समितीत आंदोलन

Next
ठळक मुद्देपदाधिकारी संतापले : डीएमओ लिपिकाच्या शिरावर टाकले हरभरे

अमरावती : नाफेडच्यावतीने बाजार समितीच्या यार्डात तूर व हरभऱ्याची मोजणी कासवगतीने करण्यात येत असल्याने व साडेसहा हजार शेतकऱ्यांना कूपन दिलेल्या मालाची अद्यापही मोजणी न झाल्याने आ. रवि राणा यांनी कार्यकर्त्यांसोबत बाजार समितीतील नाफेडच्या मोजणी केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत बुधवारी दुपारी दोन तास आंदोलन केले.
डीएमओचे कनिष्ठ लिपिक अनिल देशमुख समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिरावर चक्क हरभरे टाकून आपला रोष व्यक्त केला. यामुळे काही वेळ वातावरण गरम झाले होते. पण, पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
नाफेडकडून तूर व हरभरा मोजणीचे कुठलेही नियोजन झाले नाही. त्यामुळे अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. मोजणी केलेला माल ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नाही. यासंदर्भाची माहिती आ. रवि राणा यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिली. त्यांनीही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून तातडीने चार गोदामे शेतकºयांचा माल ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले आणि तसे पत्र घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी टाकसाळे यांना आंदोलनस्थळी पाठविण्यात आले. त्यामुळे शेतकरी काही वेळेनंतर शांत झाले.

Web Title: Movement in Rana's Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.