रामपुरी कॅम्प येथील देशी दारु दुकान हटविण्यासाठी आंदोलन

By admin | Published: September 10, 2015 12:11 AM2015-09-10T00:11:23+5:302015-09-10T00:11:23+5:30

येथील प्रभाग क्र. ५ मध्ये रामपुरी कॅम्प सिध्दार्थ नगर परिसरात मनपाच्या जागेत असलेले दारुचे दुकान हटविण्यात यावे, ...

Movement to remove country liquor shop at Rampuri camp | रामपुरी कॅम्प येथील देशी दारु दुकान हटविण्यासाठी आंदोलन

रामपुरी कॅम्प येथील देशी दारु दुकान हटविण्यासाठी आंदोलन

Next

नाहक त्रास : व्यसनाधिनतेने परिवार होतात उद्ध्वस्त
अमरावती : येथील प्रभाग क्र. ५ मध्ये रामपुरी कॅम्प सिध्दार्थ नगर परिसरात मनपाच्या जागेत असलेले दारुचे दुकान हटविण्यात यावे, या मागणीचे निवेदन बुधवारी शेकडो महिलांनी महापालिका आयुक्तांना दिले.
या देशी दारु दुकानाजवळच सिंधी हिंदी शाळा, बौध्द विहार वाचनालयक आदी सार्वजनिक स्थळ आहेत. या दोनही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना दारू प्राषन केलेल्या व्यक्तींकडून त्रास होतो. यापरिसरात अधिक मजूरवर्ग आहे. त्यामध्ये व्यसनाधिनतेत वाढ होत आहे. मजूर रोजीरोटी यामध्ये गमावित असल्याने महिला वर्गांना त्रास होतो. हे देशीदारुचे दुकान स्थलांतरित करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यात आले.यावेळी बेबी भगत, पद्मा तायडे, सुवर्णा प्रधान, शिला गोडबोले, जया वरघट, सुजाता पाटील, मीना अंभोरे, रत्ना चक्रे, वैशाली कोकाटे, दुर्गा रामटेके, कुसुम जवंजाळ, राजश्री वानखडे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Movement to remove country liquor shop at Rampuri camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.