विद्यापीठात घसारा निधीला भगदाड पडण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 02:54 PM2024-07-30T14:54:12+5:302024-07-30T15:01:59+5:30

Amravati : व्यवस्थापन परिषदेत आज देणार अधिकृत मान्यता?

Movements to destroy the depreciation fund in the university | विद्यापीठात घसारा निधीला भगदाड पडण्याच्या हालचाली

Movements to destroy the depreciation fund in the university

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावतीः
संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठात सामान्य निधीवर डोळा ठेवून तो रिकामा करण्यात अनेकांचा हातभार लागला. आता घसारा निधीला भगदाड पाडण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. ३० जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घसारा निधी खर्च करण्याला मंजुरी देण्यात येणार आहे.


तत्त्वावर सुरू झालेल्या निरंतर शिक्षण विभागात चालणाऱ्या फुटकळ अभ्यासक्रमांवर होणारा खर्च डोळे विस्फारणारा आहे. तो कमी करण्यासाठी अधिसभेत डॉ. संतोष बन्सोड यांनी प्रस्ताव सादर केला होता. वास्तविक स्वतःच्या विभागाचे स्वतंत्र माहिती पत्रक, स्वतंत्र दिनदर्शिका, स्वतंत्र प्रमाणपत्र छापून घेणाऱ्या या विभागाने गतवर्षी स्वतःचा वेगळा दीक्षांत समारंभ घेणाऱ्या या विभागाच्या मनमानी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती गठित करणे गरजेचे आहे. 


शंभर कोटींचा जनरल फंड काही लाखांवर आणण्यात अनेकांचा हातभार लागला. कायम विनाअनुदान तत्त्वावरील पदव्युतर विभाग, स्वयंअर्थसहायित तत्त्वावर सुरू केलेले, पण जनरल फंडाची दरवर्षी लूट करणारे आजीवन विस्तार विभागाचे उपक्रम, प्रवेश संख्येचा विचार न करता दरवर्षी विविध विभागांत होणारी शेकडो तासिका तत्त्वावरील प्राध्यापक भरती, दरवर्षीची बांधकामे, वारेमाप साहित्य खरेदी अशा अनेक प्रकारे सामान्य निधी खर्च होत असतो. दीक्षांत समारंभावर होणारा लाखोंचा खर्च, विविध कार्यक्रम व सप्ताह आयोजित करताना होणाऱ्या जेवणावळी, सेवानिवृत्तांना पुनःसेवेत घेण्याचे अजब धोरण, कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाइमवर दरवर्षी होणारा खर्च, यामुळेही आर्थिक घडी पूर्णतः विस्कळीत झाली आहे.

Web Title: Movements to destroy the depreciation fund in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.