अद्ययावत तंत्रज्ञानातून विकासाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 10:26 PM2018-03-04T22:26:26+5:302018-03-04T22:26:26+5:30
उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. अमरावतीतही रस्ते विकास, विमान सेवेसह अनेक सुविधांची उभारणी सुरू असून मोठी गुंतवणूक होत आहे. याच पार्श्वभूमीवर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वीट निर्मितीची सुरुवात गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरावी, असे प्रतिपादन उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे केले.
नांदगावपेठ येथे आधुनिक वीट कारखान्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी आ. रमेश बुंदिले, माजी आ. नरेश ठाकरे, व्ही. एन पाटील, उद्योजक शिवाजी झोंबाडे, एमगिरीचे प्रफुल्ल काळे, उद्योजक संजय जाधव, मधुकर मेहेकरे आदी उपस्थित होते.
ना. पोटे- पाटील म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्योगाची उभारणी करणा-या उद्योजक झोंबाडे यांची कर्तव्याप्रती निष्ठा व संघर्षातही टिकून राहणारी विजिगिषुवृत्ती कौतुकास्पद आहे. अशा उद्योगांच्या उभारणीमुळे गृहनिर्माण, उद्योग क्षेत्राच्या, तसेच शहराच्या विकासात भर पडणार आहे. उद्योगातून माती व फ्लायअशच्या वापरातून प्रत्येक दिवशी ५० हजार विटांची निर्मिती होऊ शकेल, असे झोंबाडे म्हणाले.