उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 12:41 PM2023-04-06T12:41:12+5:302023-04-06T12:48:00+5:30

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची विचारधारा बुडवण्याचं काम केलं, नवनीत राणांची टीका

MP Navneet Rana harsh comment on Uddhav Thackeray at amravati | उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्या ठिकाणी... नवनीत राणांचा संकल्प

googlenewsNext

अमरावती : हनुमान जयंतीनिमित्त बडनेरा येथे सामुहिक हनुमान चालिसा पठणाच्‍या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. राम भगवानने अच्छे अच्छोंका घमंड मिट्टी में मिला दिया, तुम किस खेत की मुली हो.. असा हल्लाबोल राणा यांनी केला.

राज्यात आज हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बडनेरा मार्गावरील एका लॉनमध्ये हनुमान चालिसा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना नवनीत राणा १४ दिवसांच्या तुरुंगवारीची आठवण काढली. हनुमान चालीसा पठण केले म्हणून जेलमध्ये टाकले. त्यांनी मला तुरुंगात टाकलं पण माझा विश्वास ते तोडू शकले नाही, असं म्हणत राणा भावूक झाल्या होत्या.

ज्या कुटुंबात, परिवारात तुम्ही जन्माला आले ते घर तुम्ही सांभाळू शकला नाहीत. ज्या विचारधारेविचारधारेवर तुमचे ४० आमदार निवडून आले ते तुम्ही सांभाळून घेऊ शकला नाहीत. ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पानी केलं आणि हिंदू विचारधारा देशात निर्माण केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या मेहनतीवर माती टाकण्याचं काम केलं, अशी टीका राणा यांनी केली.

''उद्धव ठाकरेजी तुम्ही मोठ्या परिवारात जन्म जरी घेतला असला तरी भावनागरीब लोकांसाठी आमची आस्था आमच्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे''असं राणा म्हणाल्या. जो रामललामध्ये विश्वास ठेवत नाही जो हनुमंतामध्ये विश्वास ठेवत नाही. व जिथे जिथे महाविकास आघाडीची सभा होत आहे, उद्धव ठाकरे यांची भाषणं होत आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला शुद्धीकरण करण्याचं काम करायचं आहे. तसेच त्या परिसरात हनुमान चालिसा पठण सगळ्या लोकांनी केलं पाहिजे, असंही राणा यावेळी म्हणाल्या. 

Web Title: MP Navneet Rana harsh comment on Uddhav Thackeray at amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.