खासदारांना पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात दिसले दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:12 AM2021-07-17T04:12:15+5:302021-07-17T04:12:15+5:30
फोटो - दर्यापूर १६ टीप - आजच्या दिवशी ही बातमी राखून ठेवावी. ------------------------------------------------------------------------------------------------------- थिलोरी येथील सरपंचाचा पत्रकार परिषदेत आरोप, ...
फोटो - दर्यापूर १६
टीप - आजच्या दिवशी ही बातमी राखून ठेवावी.
-------------------------------------------------------------------------------------------------------
थिलोरी येथील सरपंचाचा पत्रकार परिषदेत आरोप, राजकारण पेटले
दर्यापूर : तालुक्यातील थिलोरी या पूरग्रस्त गावाच्या भेटीत खासदार नवनीत राणा यांना केवळ दोष दिसून आल्याचा आरोप सरपंच मीना शशांक धर्माळे यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी केला.
मुसळधार पावसाने ११ जुलै रोजी थिलोरी गावाच्या मधोमध असणाऱ्या लेंडी नाल्याला पूर आला होता. ग्रामपंचायतीकडून चुकीच्या पद्धतीने खोलीकरण झाल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला होता; मात्र नाल्याचे खोलीकरण योग्य रीतीनेच झाले. त्यामुळे यंदा पाणी शिरले तरी कोणतेही नुकसान झाले नाही. आमदार बळवंत वानखडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, जि.प. आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनी या कामाचे कौतुक केले होते, असे सरपंच मीना धर्माळे म्हणाल्या. पत्रकार परिषदेला उपसरपंच गौतम वाकपांजर, सामाजिक कार्यकर्ते शशांक धर्माळे, ग्रामपंचायत सदस्य पद्मा कुडे, सविता वाकपांजर, स्वाती खंडारे, कल्पना होले, नंदकिशोर टापरे, अमित होले आदी उपस्थित होते.
160721\20210715_171201.jpg
खासदार नवनीत राणांचा पूरग्रस्त दौरा राजकीय स्टंटबाजी.. (थिलोरी येथील सरपंचांचा आरोप)
( राजकीय वक्तव्याने गावातील राजकारण पेटले..)