वादग्रस्त डीएफओंच्या बदलीसाठी खासदार, आमदार सरसावले; मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान सचिव, वनबल प्रमुखांना पत्र

By गणेश वासनिक | Published: February 17, 2024 06:44 PM2024-02-17T18:44:01+5:302024-02-17T18:44:51+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन खात्याच्या प्रधान सचिवांकडे १४ फेब्रुवारी रोजी डीएफओंच्या बदलीसाठी पत्र वजा मागणी करण्यात आली आहे.

MPs, MLAs rush to replace controversial DFOs Letter to Chief Minister, Forest Minister, Principal Secretary, Chief of Forest Force | वादग्रस्त डीएफओंच्या बदलीसाठी खासदार, आमदार सरसावले; मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान सचिव, वनबल प्रमुखांना पत्र

वादग्रस्त डीएफओंच्या बदलीसाठी खासदार, आमदार सरसावले; मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान सचिव, वनबल प्रमुखांना पत्र

अमरावती: वन विभागाच्या अमरावती प्रादेशिकचे वादग्रस्त उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांची तत्काळ बदली करावी, या मागणीसाठी खासदार, दोन आमदार सरसावले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन खात्याच्या प्रधान सचिवांकडे १४ फेब्रुवारी रोजी डीएफओंच्या बदलीसाठी पत्र वजा मागणी करण्यात आली आहे. वर्धा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या मागणीनुसार डीएफओ मिश्रा यांचे कर्तव्य सतत वादग्रस्त ठरत असून एका महिला आरएफओंना मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणूक दिल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. डीएफओ मिश्रा यांनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत ईको टुरिझम शीर्ष अंतर्गत कोणतेही कामे घेतली नाही. शासनाच्या विविध योजनेतंर्गत विकास कामे करण्यात त्यांना स्वारस्य नाही.

४ कोटींच्या कामाची प्रशासकीय मान्यता आणि अंदाजपत्रक तयार असताना निधी खर्च करण्यात आला नाही. ई-निविदा राबविण्यास मिश्रा यांची नकारघंटा असल्याचे खासदार रामदास तडस यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच मिश्रा यांना लोकप्रतिनिधी, सामान्य व्यक्ती कामानिमित्य भेटण्यासाठी आले असता ते भेट घेण्याचे टाळतात, असा आक्षेप घेण्यात आला आहे. जनतेच्या समस्या, विकासकामे वेळेत होत नसल्याने डीएफओ मिश्रा यांच्याप्रती नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. लोकप्रतिनिधींच्या कामांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शासनाची बदनामी होत आहे. त्यामुळे डीएफओ मिश्रा यांची ईतरत्र बदली करावी, अशी मागणी खासदार तडस यांनी केली आहे.

Web Title: MPs, MLAs rush to replace controversial DFOs Letter to Chief Minister, Forest Minister, Principal Secretary, Chief of Forest Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.