एमपीएससी परीक्षांचे गाेपनीय साहित्य कलेक्टर कस्टडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:12 AM2021-04-14T04:12:45+5:302021-04-14T04:12:45+5:30

अमरावती : कोरोना संसर्गामुळे ११ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा- ...

MPSC examination confidential material in the custody of the Collector | एमपीएससी परीक्षांचे गाेपनीय साहित्य कलेक्टर कस्टडीत

एमपीएससी परीक्षांचे गाेपनीय साहित्य कलेक्टर कस्टडीत

Next

अमरावती : कोरोना संसर्गामुळे ११ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा- २०२० पोस्टपोन करण्यात आली. त्यामुळे या परीक्षांसाठीचे आलेले गोपनीय साहित्य जिल्हाधिकारी यांच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी ९ एप्रिल रोजी पत्र जारी करून परीक्षा पुढे ढकलण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने एमपीएससी परीक्षांच्या अनुषंगाने चालविलेल्या तयारीवर तूर्त विराम लागला आहे. अमरावती शहरात एमपीएससी परीक्षेसाठी ४८ शाळा, महाविद्यालयांत नियोजन करण्यात आले होते.

अमरावती विभागातून या परीक्षेसाठी १४,५४४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या दरम्यान एकाच सत्रात परीक्षा होणार होती. त्याकरिता १२ समन्वय अधिकारी, दोन भरारी पथकप्रमुख, ४८ केंद्रप्रमुख, १८७ पर्यवेक्षक, ६८० समवेक्षक, ९६ लिपिक व ९६ शिपायांची नियुक्ती करण्यात आले होती. उमेदवारांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर पाऊच आयोगामार्फत पुरविण्याची तयारी होती. परीक्षा केंद्रावर कर्तव्यावरील नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी देखील पार पडली. मात्र, काेरोनामुळे परीक्षा पोस्टपोन झाल्यात आणि विद्यार्थ्यांच्या इच्छा, अपेक्षांवर पाणी फेरले. परीक्षेसाठी आयोगाने पाठविलेले संवेदनशील गोपनीय सामग्री, कोविड किट, हजेरीपट, स्टीकर्स व इतर लेखनसामग्री विषयांकित परीक्षेची सुधारित तारीख जाहीर होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी ‘लोकमत’ला दिली.

-------------------

Web Title: MPSC examination confidential material in the custody of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.