मोर्शी येथे एमपीएससी, यूपीएससी स्टडी ॲकेडमी निर्माण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:19+5:302021-08-22T04:16:19+5:30
मोर्शी : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध पुस्तकांची उपलब्धी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने आमदार भुयार यांनी एमपीएससी, ...
मोर्शी : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणाऱ्या विविध पुस्तकांची उपलब्धी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने आमदार भुयार यांनी एमपीएससी, यूपीएससी स्टडी ॲकेडमी निर्माण करण्याची संकल्पना डोळ्यापुढे ठेवून त्यासाठी १ कोटींची मंजुरी मिळविली आहे. याबद्दल स्पर्धा परीक्षार्थींनी त्यांचे आभार मानले आहे.
मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेेला बसतात. परंतु पुस्तक महागडी असल्याने ती खरेदी करणे शक्य नसते. अशावेळी ही पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध करून दिल्यास युवकांचा ओढा ग्रंथालयाकडे वळेल व त्याचा गरीब मुलांना फायदा होईल, ही संकल्पना आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाठपुरावा केला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी ॲकेडमी निर्माण करण्याकरिता १ कोटींचा निधी मंजूर करवून विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टीने ही स्टडी ॲकेडमी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. मोर्शी येथे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यूपीएससी, एमपीएससी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास करून ते तंत्र आत्मसात करण्याची संधी प्राप्त होणार आहे. अर्थाने त्याचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वाचनाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.