मिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 05:00 AM2020-09-23T05:00:00+5:302020-09-23T05:00:02+5:30

मुख्याधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी अवैध बांधकाम थांबविण्यासाठी आणि स्वत:हून अतिक्रमण मोकळे करण्यासाठी आदेश पारित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल करण्याचासुद्धा आदेशात उल्लेखत होता. मात्र, आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही बांधकाम अविरत सुरू ठेवून पहिल्या माळ्याचा स्लॅब मध्यरात्री उरकण्यात आला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन जिवंत आहे की मृतावस्थेत गेलेली आहे, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.

Mr. CO, where did the criminal proceedings go? | मिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई?

मिस्टर सीओ, कुठे गेली फौजदारी कारवाई?

Next
ठळक मुद्देबांधकाम सुरूच : एकच पाठीराखा नगरसेवक नगरपंचायतवर ‘लय भारी’

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरातील मुख्य मार्गावरील चंद्रलोक मार्केटसमोरील रस्त्यावर होणारे बांधकाम नगरपंचायतीसाठी आव्हान ठरले आहे . सर्वांदेखत दिवसभर पहिल्या माळ्याचे सेंट्रिंग बांधण्यात आले आणि नगरपंचायतीच्या नाकावर टिच्चून सोमवारी मध्यरात्री स्लॅब टाकून बांधकाम पूर्ण झाले. ‘त्या’ नगरसेवकाच्या धाडसाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
एकीकडे नगरपंचायत प्रशासन अतिक्रमण निर्मूलनाच्या घोषणा करीत असताना, थेट रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामाचे नियंत्रण एका नगरसेवकाने आपल्या हातात घेऊन ते पूर्ण केले. नगरपंचायतीने वेळोवेळी बजावलेल्या नोटीसचे सतत उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवून नगरपंचायतीवर एका नगरसेवकाने नामुष्कीची वेळ आणली. शुक्रवारी झालेल्या अंतिम आदेशानंतरसुद्धा शनिवार आणि रविवार दोन दिवसांत पहिल्या माळ्याचा स्लॅब रात्रीपर्यंत उरकून टाकण्यात त्या नगरसेवकाला यश मिळाले आहे .
मुख्याधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबर रोजी अवैध बांधकाम थांबविण्यासाठी आणि स्वत:हून अतिक्रमण मोकळे करण्यासाठी आदेश पारित केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी दाखल करण्याचासुद्धा आदेशात उल्लेखत होता. मात्र, आदेशाची प्रत मिळाल्यानंतरही बांधकाम अविरत सुरू ठेवून पहिल्या माळ्याचा स्लॅब मध्यरात्री उरकण्यात आला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन जिवंत आहे की मृतावस्थेत गेलेली आहे, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.
नगरपंचायतमध्ये नियमित मुख्याधिकारी नाही. त्यामुळे चिखलदºयाच्या मुख्याधिकाऱ्यांकडे धारणी नगरपंचायतचा प्रभार सोपविण्यात आले. त्यांनी गुरुवार आणि शुक्रवारी धारणीत मुक्काम ठेकला. ते अतिक्रमण तोडून मोकळे करण्याचे आदेश शुक्रवारी संबंधित व्यावसायिकाला जारी करून निघून गेले. मात्र, त्यांच्या आदेशाचे सतत दोन दिवस उल्लंघन होत होते. आता मुख्याधिकाºयांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे फौजदारी कारवाई कोण करणार, असा सवाल आता धारणीकर विचारत आहेत. या प्रकरणामुळे शहरात अवैध बांधकांमांना ऊत येईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुख्याधिकारी नॉट रिचेबल
प्रस्तुत प्रतिनिधीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न दोन दिवसांपासून केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. एवढेच नव्हे तर त्यांना सुरू असलेल्या घडामोडीचे छायाचित्र व्हॉट्सअप केल्यानंतरसुद्धा कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही. . त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ‘अर्थकारण’ भारी पडल्याचे निष्पन्न होत आहे .

Web Title: Mr. CO, where did the criminal proceedings go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.