महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:06+5:302021-02-06T04:23:06+5:30

अमरावती : महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवास्तव वीजबिले दिले. त्यानंतर वीजबिले माफी देऊ, वीजबिल सूट देऊ १०० युनिटपर्यंत ...

MSEDCL Chief Engineer's Office locked | महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाला ठोकले कुलूप

महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाला ठोकले कुलूप

Next

अमरावती : महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना अवास्तव वीजबिले दिले. त्यानंतर वीजबिले माफी देऊ, वीजबिल सूट देऊ १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणा केल्यामुळे ग्राहकांनी सवलत मिळविण्यसाठी वाट पाहिली. परंतु, आता सक्तीची वसुली चालविल्याच्या निषेधार्थ भाजपने वीज महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयाला शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महावितरण मुख्य अभियंता कार्यालयात कुलूप ठोकले व हल्लाबोल आंदोलन केले. सदर तालाठोको आंदोलन शहरातील सातही महावितरणच्या मंडळावर करण्यात आले. मुख्ळ अभियंता कार्यालयावर सदर आंदोलन माजी पालकमंत्री आमदार प्रविण पोटे, शहर जिल्हाअध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्वात मंडळ अध्यक्ष गजानन जाधव, नगरसेविका तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. विवेकानंद मंडळ येथे माजी आमदार सुनील देशमुख, राधा कुरील, प्रकाश डोफे , राजु मेटे यांनी तर अंबा मंडळात रविंद्र खांडेकर, गजानन देशमुख राजेश गोयंका, तसेच साई मंडळात तुषार भारतीय, महापौर चेतन गावंडे, मंगेश खांडे, सुनील काळे, राजेश किटूकले, विद्यापीठ मंडळात संध्या टिकले राजेश आखेगावकर, जगदीश कांबे, दिनेश चवणे,कॉर्टन मार्केट मंडळात दिपक खताडे, कुसुम साहुल कौशिक अग्रवाल आदींनी महावितरणच्या केंद्रावर टालाठोके आदोलन केले.

Web Title: MSEDCL Chief Engineer's Office locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.