महावितरणचे चार हजारांवर कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:12 AM2021-05-08T04:12:56+5:302021-05-08T04:12:56+5:30

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयासह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अमरावती परिमंडळात ...

MSEDCL has over 4,000 employees on duty | महावितरणचे चार हजारांवर कर्मचारी कर्तव्यावर

महावितरणचे चार हजारांवर कर्मचारी कर्तव्यावर

Next

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालयासह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अमरावती परिमंडळात महावितरणचे ४,२५० हून अधिक अधिकारी, अभियंते व कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता संसर्ग लक्षात घेता, ऊर्जामंत्र्याच्या निर्देशानुसार शासकीय तसेच खासगी रुग्णालये, कोविडचे विशेष कक्ष, विलगीकरण कक्ष तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावशक सेवांना अखंडित वीजपुरवठा मिळेल, याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतली जात आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेसाठी तत्काळ नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रियाही महावितरणकडून राबविली जात आहे.

लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरी बसणे सुरळीत वीजपुरवठ्यामुळेच शक्य होत आहे. त्यातच आता दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. सर्वच नागरिक घरी असल्याने घरोघरी विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करीत आहेत.

बॉक्स

चार हजारांवर कर्मचारी कार्यरत

अमरावती परिमंडळ अंतर्गत महावितरणचे ३७२ अभियंते, १९१६ जनमित्र, ६१९ यंत्रचालक, ८४० बाह्यस्रोत कर्मचारी, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत आहे. यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या साहाय्यासाठी व्यवस्थापनातील ५१० पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही सेवा बजावत आहेत.

बाॅक्स

वर्षभरात ३५३ कर्मचारी संक्रमित

महावितरणचे कर्तव्य बजावताना वर्षभरात परिमंडळातील ३५३ कर्मचाऱ्यांना संक्रमण झाले. सद्यस्थितीत १४२ कर्मचारी हे कोरोनाबाधित आहेत. सात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत महावितरण ग्राहकांच्या सेवेत आहे. वीज ग्राहकांनी कोरोनाविरुद्धच्या या लढाईला सहजतेने न घेता मास्क, शारीरिक अंतर राखावे तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन होत आहे.

Web Title: MSEDCL has over 4,000 employees on duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.