चिखलदऱ्याच्या जि.प. विश्रामगृहात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:39 AM2019-08-10T01:39:09+5:302019-08-10T01:39:43+5:30

येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात शनिवारी दारू पिऊन धिंगाणा घालत तेथील साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित शाखा अभियंत्याने जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना तसा अहवाल पाठविल्याने धिंगाणा घालणारे जिल्हा परिषद सदस्य कोण, याबाबत मोठे चर्वितचर्वण सुरू आहे.

Muddy's Jeep Sabbath vandalism | चिखलदऱ्याच्या जि.प. विश्रामगृहात तोडफोड

चिखलदऱ्याच्या जि.प. विश्रामगृहात तोडफोड

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद सदस्य की कोण ? : चौकशी सुरू, मद्यपींचा धुडगूस

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : येथील जिल्हा परिषद विश्रामगृहात शनिवारी दारू पिऊन धिंगाणा घालत तेथील साहित्याची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. संबंधित शाखा अभियंत्याने जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांना तसा अहवाल पाठविल्याने धिंगाणा घालणारे जिल्हा परिषद सदस्य कोण, याबाबत मोठे चर्वितचर्वण सुरू आहे.
चिखलदरा येथील शासकीय विश्रामगृह दारू, मटण पार्टी आणि वाढदिवस व अन्य खासगी समारंभासाठी वापरले जात असल्याचा प्रकार वारंवार उघडकीस येत आहे. आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री यांच्या नावाची पत्रे घेऊन त्यांचे चेलेचपाटे, कार्यकर्ते धिंगाणा घालत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गत आठवड्यात प्रकाशित केले होते. २० दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे हे विश्रामगृह चौकीदारी करणाºया मैलकुलीकडून उघडून घेण्यात आले आणि धिंगाणा घातल्याचे पुढे आले. ३ आॅगस्टला तत्कालीन परिचर व जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात लिपिक पदावर कार्यरत अब्दुल शफीक यांनी चौकीदार नानू ठाकरे यांना जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या पाहुण्यांसाठी स्थानिक विश्रामगृह उघडून देण्याची सुचना दूरध्वनीद्वारे केली. त्यानुसार चौकीदाराने ते उघडून दिले, असे शाखा अभियंता अमर शेंडे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

तोडफोड करणारे कोण?
चिखलदरा पर्यटनस्थळावर येत असलेल्या हजारो पर्यटकांमुळे हॉटेल आणि शासकीय विश्रामगृह हाऊसफुल आहेत. त्यामुळे रात्री मुक्कामी थांबण्यासाठी कुठे जागा मिळत नसल्याने विश्रामगृहावर वादविवाद व शिव्यांच्या लाखोल्या वाहिली जाण्याचे प्रकार वाढले आहेत. जिल्हा परिषद विश्रामगृहात तोडफोड करणारे ते जिल्हा परिषद सदस्य की संबंधित लिपिक अब्दुल शफिक याने पाठविलेले पाहुणे, हे पुढे येणे गरजेचे आहे.

दारू पिऊन धिंगाणा साहित्याची तोडफोड
विश्रामगृहाच्या कक्षात संबंधित इसमांनी दारू पिऊन धिंगाणा घातला. साहित्याची तोडफोड केली. शनिवारी रात्री १० नंतर धुमाकूळ घालण्यात आला. त्यादरम्यान शिवीगाळ आणि शाब्दिक चकमक रंगली. या तोडफोडीचा अहवाल पाठविण्यात आला आहे.

विश्रामगृहाच्या साहित्याची तोडफोड करण्यात आली. कोणाच्या आदेशावरून संबंधिताने कक्ष उघडून दिले, याचा संपूर्ण अहवाल कार्यकारी अभियंत्यांना पाठविला आहे.
- अमर शेंडे,
शाखा अभियंता, चिखलदरा

Web Title: Muddy's Jeep Sabbath vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.