आजपासून मूग, उडदाची आॅनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 10:54 PM2017-10-02T22:54:23+5:302017-10-02T22:56:02+5:30

यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच मूग व उडीद हमीपेक्षा कमी भावाने विक्री केले जात असल्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे.

Mug, Udadachi online registration from today | आजपासून मूग, उडदाची आॅनलाईन नोंदणी

आजपासून मूग, उडदाची आॅनलाईन नोंदणी

Next
ठळक मुद्देनाफेडद्वारा पाच केंद्रांवर खरेदी : खरेदीपूर्व शेतकºयांना ‘एसएमएस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच मूग व उडीद हमीपेक्षा कमी भावाने विक्री केले जात असल्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे. त्यामुळे नाफेडद्वरा हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर तीन आॅक्टोबरपासून आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे. नोंदणीचा व खरेदीपूर्व‘ एसएमएस’ शेतकºयांना पाठविण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग व उडदासारखे पीक उद्ध्वस्त झाले. यामधून जे पीक वाचले ते आता मातीमोल भावाने विकले जात आहे. वास्तविकता यंदाच्या हंगामासाठी केंद्र शासनाने हमीभाव जाहीर केले आहेत. त्यानुसार मुगाला ५,५७५ यामध्ये २०० रूपये बोनस, तर उडदाला ५,४०० रूपये यामध्ये २०० रूपयांचा बोनस असे हमीभाव आहेत. प्रत्यक्षात शेकºयांचा माल बाजारात आल्यावर एक ते दीड हजार रूपये प्रतीक्विंटलने व्यापाºयांनी खरेदी सुरू केली. बाजार समित्यांचे व्यापाºयांवर नियंत्रण नसल्यामुळे शेतकºयांची लूट होत असल्याने आता सहकार व पणन विभागाने नाफेडद्वारा तीन आॅक्टोबरपासून शासकीय खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अमरावती, अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार व चांदूररेल्वे या पाच केंद्रांवर मंगळवारपासून शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. खरेदीचे पूर्व शेतकºयांना ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येणार आहे.

नोंदणीसाठी ही माहिती आवश्यक
नोंदणीसाठी शेतकºयांनी खरीप हंगामातील पीक-पेºयानुसार सात-बारा उताºयाची मूळप्रत, आधारकार्ड झेरॉक्स, बँकखाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी माहितीसह आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी क्रमांकाचा ‘एसएमएस’ शेतकºयांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे.

यंदाच्या हंगामातील मूग व उडदाची खरेदी केंद्रे नाफेडची मंजुरी मिळताच सुरू करण्यात येतील. प्रथम पाच केंद्रांवर खरेदी करण्यात येईल. यासाठी शेतकºयांनी तीन आॅक्टोबरपासून आॅनलाईन नोंदणी करने महत्त्वाचे आहे.
- गौतम वालदे,
जिल्हा उपनिबंधक

आॅनलाईन नोंदणीसाठी संबंधित खरेदी विक्री संघाच्या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. केंद्रांच्या ठिकाणी हे कर्मचारी शेतकºयांची कागदपत्रे घेऊन आॅनलाईन नोंद करतील. याचा शेतकºयांना एसएमएस येईल.
- अशोक देशमुख,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Web Title: Mug, Udadachi online registration from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.