गुणाकार झाला सोपा, सात सेकंदात उत्तर तयार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:44 PM2018-04-16T16:44:45+5:302018-04-16T16:44:56+5:30

अमरावती जिल्ह्यातील सुभाष दाभिरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी गणिताची अत्यंत सोपी पद्धत शोधून काढली. हे करत असताना त्यांनी अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला.

Multiplied, easy to answer in seven seconds | गुणाकार झाला सोपा, सात सेकंदात उत्तर तयार 

गुणाकार झाला सोपा, सात सेकंदात उत्तर तयार 

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील गणित तज्ज्ञांनी शोधली नवीन पद्धत

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदल चव्हाण/अमरावती : गणित म्हणताच अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: मनात धडकी भरते. त्यातही बरेच विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे वारंवार समोर आले आहे. विद्यार्थ्यांमधील ही गणिताची विशेषत: गुणाकाराची, वर्गाची भीती घालवण्यासाठी सुभाष दाभिरकर यांनी हसत-खेळत गणित याद्वारे शिकविण्याची पद्धत शोधून काढली आहे. त्यासाठी त्यांनी क्षणार्धात गणित ही हस्तपुस्तिका सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी गुणाकारात कच्चे आहेत, त्यांच्यासाठी कितीही कठीण गुणाकार अवघ्या सात सेकंदात करणे फार सोपे झाले आहे.
दैनंदिन जीवनात गणिताचा खूप घनिष्ट संबंध असतो. मात्र, हा विषय शिकविण्याच्या पद्धतीमुळे त्याची भीती अनेकांच्या मनात निर्माण होते. यातूनच विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल तेढ निर्माण होऊन ते केवळ सोप्या कृती करून उत्तीर्ण होण्याकडे लक्ष पुरवितात. नेमके हेच पाहून सुभाष दाभिरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोपी पद्धत शोधून काढली. हे करत असताना त्यांनी अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षण हे केवळ सरकारचीच नाही तर समाजातील प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे. शिक्षणाचा पाया घट्ट करण्यासाठी विविध नवोपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात बदल घडविणे ही आपली जबाबदारी आहे. असे उपक्रम शिक्षणाला नवी दिशा देणारे ठरतात.
सुभाष दाभिरकर हे वरूड तालुक्यातील टेंभुरखेडा येथील असून, अंक गणिताची त्यांना विलक्षण आवड आहे. त्यांनी गणितातील सोप्या आणि सहज पद्धती विकसीत केल्या आहेत. रसायनशास्त्रातील क्षणार्धात सांगता येणारा मॉडर्न पिरॉडिक टेबल, त्रिकोणमितीतील लगेच सांगता येणारे सूत्र, तसेच लॉग टेबल, वर्गमूळ, घनमूळ त्यांच्या तोंडपाठ आहे. उदा ८६८४२४८२ गुणिले ५ बरोबर मोठ्या संख्येतील आकडे निम्मे करणे व पुढे एक शून्य जोडणे म्हणजे ४३४२१२४१० हा वरील संख्येचे ५ ने केलेले गुणाकार होय. अशाप्रकारे सोप्या भाषेत त्यांनी विश्लेषण केले आहेत.

Web Title: Multiplied, easy to answer in seven seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.