तिवसा ग्रामीण रुग्णालयात लढा संघटनेचे मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:12 AM2021-05-22T04:12:39+5:302021-05-22T04:12:39+5:30
फोटो पी २१ तिवसा तिवसा : जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना अभय ...
फोटो पी २१ तिवसा
तिवसा : जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या तसेच या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना अभय देणाऱ्यांच्या निषेधार्थ लढा संघटनेने शुक्रवारी तिवसा ग्रामीण रुग्णालयात मुंडन आंदोलन केले.
रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना उपचारात आवश्यक केल्या गेले. तेंव्हापासून रेमडेसिविर हे वाढीव दरात विकले गेले. त्यातच अमरावती जिल्ह्यात काही महाभागांनी रेमडेसिविरच्या वाटपात गैरप्रकार केला. पोलिसांनी त्या टोळीला अटक करून पर्दाफाश केला. परंतु, पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडी न मागितल्याने न्यायालयाने जामीन त्याच दिवशी मंजूर केला. पोलिसांनी कोठडी का मागितली नाही, असा सवाल निर्माण झाला. लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख आणि जिल्हा अध्यक्ष योगेश लोखंडे यांनी या गंभीर प्रकारचा मुंडन करून निषेध केला. यावेळी अंकुश गायकवाड, पंकज चौधरी, विजय उंदरे, विजय सपाटे, मंगेश ठाकूर, सूरज कुरजेकर, संदीप राघोर्ते, नीलेश राऊत इत्यादी लढा संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.