महापालिका : ५४
By admin | Published: February 22, 2017 12:04 AM2017-02-22T00:04:28+5:302017-02-22T00:04:28+5:30
महापालिकेच्या ८६, जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले.
विलासनगर-मोरबाग सर्वाधिक ६२.०३ : साईनगर निचांकी ४७.६७
अमरावती : महापालिकेच्या ८६, जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समितीच्या ८८ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. महापालिका क्षेत्रात केवळ ५४.३० टक्के मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले. तर जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सरासरी ६५ टक्के मतदान झाले. मंगळवारच्या मतदानानंतर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ६२७ तर जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ९५० उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. जिल्हा परिषद व महापालिकेची मतमोजणी गुरुवार २३ फेब्रुवारीला होईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी तहसीलस्तरावर तर महापालिका निवडणुकीची मतमोजणी विभागीय क्रीडा संकुलात होईल.
अमरावती : महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेतील ८६ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांनी शिस्तीत रांगा लावून मतदान केले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदानकेंद्रांवर दुपारी ३ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदारांनी मतदान केले.
मतपत्रिकेचा क्रम चुकल्याने गोंधळ
अमरावती : सन २०१२ ला सुद्धा सरासरी ५४ टक्के मतदार झाले होते. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानानंतर ६२७ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले. गुरूवार २३ फेब्रुवारीला येथिल विभागीय क्र ीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक ठिकाणी मतदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मतदार यादीतील घोळामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी मतदान केंद्रात बसून मतदारांना धमकावण्याचा प्रकार उघड झाला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी युवा स्वाभिमान कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने मतदारांना एकाच वेळी चार जणांना मतदान करावे लागले. अ,ब,क,ड हा क्रम चुकल्याने काही मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने मंगळवारी २२ प्रभागातील ८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली. (प्रतिनिधी)
मोरय्यांना बाहेर काढले
राजापेठ प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवार जयश्री मोरय्या या मतदानकें द्राच्या आवारात बसून मतदारांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले. अंबिकानगरस्थित महापालिकेच्या हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
मतदारयादीत नाव सापडेना
यंदाची सार्वत्रिक निवडणूक चारसद्स्यीय प्रभागपद्धतीने होत असल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. सन २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागात घेण्यात आली. या ४३ प्रभागांचे यंदा २२ प्रभागात विलिनीकरण करण्यात आल्याने प्रभागाच्या लोकसंख्येसोबतच मतदारांची संख्या वाढली. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली. अनेकांना त्यांची नावे मतदारयादीत सापडू शकली नाहीत. तर अनेकांची नावे लगतच्या प्रभागामध्ये दिसून आल्याने मतदारांची वेळेवर धावाधाव झाली.