महापालिकेत ८० कोटींचा अपहार!

By Admin | Published: April 19, 2015 12:10 AM2015-04-19T00:10:40+5:302015-04-19T00:10:40+5:30

महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत.

Municipal corporation has 80 crore abductions! | महापालिकेत ८० कोटींचा अपहार!

महापालिकेत ८० कोटींचा अपहार!

googlenewsNext

पत्रपरिषद : सुनील देशमुख यांचा आरोप, शासन अनुदानाची उधळपट्टी
अमरावती : महापालिकेत गेल्या दोन वर्षांत शासन अनुदान, करातून येणाऱ्या रकमेची उधळपट्टी करुन निकृष्ट दर्जाची विकासकामे करण्यात आली आहेत. यात सुमारे ८० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे. यासाठी अभियंते, कंत्राटदार आणि अधिकारी दोषी आहेत. गुणवत्ता पडताळणीच्या अहवालानुसार ही बाब स्पष्ट झाल्यामुळे दोषींवर आता थेट कारवाई अपेक्षित आहे. तसे न झाल्यास सिव्हील कोर्टात जाऊन फौजदारी दाखल करु, असा इशारा आ. सुनील देशमुख यांनी शनिवारी येथे दिला.
येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. आ. देशमुखांनी केलेल्या आरोपानुसार विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारदरम्यान फिरत असताना झालेल्या विकासकामांबाबत नागरिकांनी त्यांच्याकडे अनेक तक्रारी केल्यात. रस्ते निर्मिती, डांबरीकरण, सिमेंट, काँक्रीटीकरणाच्या विविध कामांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले. रस्ते निर्मिती, डांबरीकरणाच्या कामात तर प्रचंड घोटाळे झाल्याचा आरोप यावेळी देशमुखांनी केला.
निवडणुकीच्या निकालानंतर जी कामे झालीत, त्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे ठरविले. तत्कालीन आयुक्तांच्या नावे पत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुण नियंत्रण मंडळाकडून प्रायोगिक तत्त्वावर १० रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे शुल्क भरण्यात आले.

बेलोरा विमानतळ, इर्विन, वाहतुकीवरही चर्चा
निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पत्रपरिषद घेऊन शहराच्या विकासात्मक विषयांवर जाहीरपणे मत प्रदर्शित करणाऱ्या आ. सुनील देशमुखांनी बेलोरा विमानतळ, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाहतूक समस्येवरही चर्चा केली. बेलोरा विमातळाचा प्रश्न सोडविण्यासाठी २३ व २४ एप्रिल रोजी सर्वच आमदारांची बैठक होऊ घातली आहे. मुंबईकडे ये-जा करण्यासाठी विमानसेवा सुरु करण्यावर भर दिला जाणार आहे. इर्विन रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन, एमआयआरची उपलब्धता तसेच वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहू, असे आ. देशमुख म्हणाले. विद्यापीठ गुणवाढ प्रकरणी खरा सूत्रधार पोलिसांनी पुढे आणला पाहिजे, असेही ते म्हणाले.

विकास कामांना दर्जा असलाच पाहिजे. यापूर्वी माझ्या प्रभागातील गोपालनगर ते एमआयडीसी रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार प्रशासनाकडे स्वत: दिली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आ. देशमुखांनी उचललेले पाऊल नागरिकांच्या हिताचेच आहे.
-चरणजितकौर नंदा,
महापौर, महापालिका.

शासन निधीतील कामांची चौकशी झालीच पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी. गुणवत्ता तपासणीमुळे मस्तवाल कंत्राटदारांना वठणीवर आणता येईल. अधिकारी, कंत्राटदारांच्या मनमानी कारभारावर अंकुश लावणे सोयीचे होईल. आ. देशमुखांचे पाऊल स्वागतार्हच म्हणावे लागेल.
-बबलू शेखावत,
पक्षनेता, काँग्रेस.

Web Title: Municipal corporation has 80 crore abductions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.