महापालिकेचा ६७० कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Published: March 31, 2015 12:17 AM2015-03-31T00:17:57+5:302015-03-31T00:17:57+5:30

साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या

Municipal Corporation's budget of 670 crores | महापालिकेचा ६७० कोटींचा अर्थसंकल्प

महापालिकेचा ६७० कोटींचा अर्थसंकल्प

Next

१०५ कोटी रुपये शिल्लक : नवीन संकुले, क्रीडांगणे, स्मार्ट सिटी
अमरावती:
साडेआठ लाख लोकसंख्येच्या मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या अमरावती महापालिकेचा ६७०.२१ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ जुळवित १०५ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजितकौर नंदा यांच्या पीठासीनाखाली पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत स्थायी समिती सभापती विलास इंगोले, आयुक्त अरुण डोंगरे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील आदींनी कामकाजात सहभाग नोंदविला.

सोमवारी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प विकासात्मक आहे. उत्पन्नाची साधने वाढविण्यासाठी भर देताना नागरिकांंंना मुलभूत सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. बीओटी तत्वावर संकुलाची निमिर्ती करताना शहराला वेगळेपण मिळावे, यासाठी नवीन संकल्पना आहे. सर्व सदस्यांना निधी मिळण्याची तरतूद आहे.
विलास इंगोले
स्थायी समिती सभापती


महापौरांच्या हस्ते आयुक्तांचा सन्मान
महापालिका आॅटो डिसीआर या बांधकाम परवानगी प्रणालीला हैदराबाद येथील संस्थेने पुरस्कार बहाल केल्याबद्दल शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. परिणामी आयुक्त अरुण डोंगरे यांचा सन्मान करण्यात यावा, असा प्रस्ताव अविनाश मार्डीकर यांनी मांडला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महापौर चरणजितकौर नंदा यांनी आयुक्तांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.

उत्पन्नात सुचविलेली प्रस्तावित वाढ
जाहिरात कर- ५ लाख
व्यापारी संकुल- १० कोटी
चिल्लर वसुली- ५ लाख
हस्तांतरित शुल्क- ५० लाख
स्थानिक संस्था कर- १० कोटी

महसुली खर्चात केलेली प्रस्तावित वाढ
नवीन वाहन- २० लाख
विद्यावेतन- ४० हजार
विहिरीतील गाळ काढणे- ५० हजार
मोठ्या व अडचणींच्या नाल्यातील गाळ काढणे- ३८ लाख
कोंडवाडा शुल्क- ५० हजार
महिला,बालकल्याण निधी- ४४ लाख
बगीचा सुधारणा- १.५० लाख
वृक्ष प्राधिकरण- ५ लाख
मनोरा तयार करणे- ९ लाख
रस्ते नझूल- १० लाख
मैदान सुधारणा- २५ हजार
मिनी स्टेडियम- १.५० लाख
समाविष्ट ग्रामीण भाग- २ कोटी
बगीचा साहित्य खरेदी- ५० हजार

पदाधिकाऱ्यांना मिळेल असा निधी
महापौर- १ कोटी
उपमहापौर- ९० लाख
स्थायी सभापती-९० लाख
पक्षनेता- ८० लाख
विरोधी पक्षनेता- ५० लाख
गटनेता- २० लाख

Web Title: Municipal Corporation's budget of 670 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.