पवारांकडून महापालिकेची प्रतिमा मलीन!

By admin | Published: August 13, 2016 12:10 AM2016-08-13T00:10:13+5:302016-08-13T00:10:13+5:30

आयुक्त तथा उपायुक्तांची पूर्वपरवानगी न घेता नगरसेवकांना पत्र देणे उपअभियंता रवींद्र पवार यांना महागात पडणार आहे.

Municipal corporation's image will be fine! | पवारांकडून महापालिकेची प्रतिमा मलीन!

पवारांकडून महापालिकेची प्रतिमा मलीन!

Next

कारणे दाखवा नोटीस : स्वअधिकारात नगरसेवकांना पत्र 
अमरावती : आयुक्त तथा उपायुक्तांची पूर्वपरवानगी न घेता नगरसेवकांना पत्र देणे उपअभियंता रवींद्र पवार यांना महागात पडणार आहे. ही कृती महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारी असून आपल्या दोन वेतनवाढी का थांबविण्यात येऊ नये, अशी नोटीस पवारांना बजावण्यात आली. उपायुक्त विनायक औगड यांनी ८ आॅगस्टला ही नोटीस बजावली. पवारांना तीन दिवसात उत्तर देणे बंधनकारक आहे.
महापालिकेत उपअभियंता या पदावर कार्यरत असलेल्या रवींद्र पवार यांनी ७ जुलैला वैयक्तिक शौचालय योजनेसंदर्भात नगरसेवकांना पत्र लिहिले. या योजनेअंतर्गत ११०११ लाभार्थ्यांचा डीपीआर मंजूर करण्यात आला होता. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता आहे. मात्र अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याने सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील वंचित लाभार्थ्यांची प्रकरणे कार्यकारी अभियंता २ या कार्यालयात सादर करावी. जेणेकरुन दलितवस्ती नागरिकांना शौचालयाचा लाभ देता येईल. असे त्या पत्रात नमूद करण्यात आले. या पत्रावर जावक क्रमांक आणि दिनांक सुद्धा नमूद नाही. मात्र कार्यकारी अभियंताकरिता म्हणून पवारांची स्वाक्षरी आहे. नगरसेवकांना कुठलेही पत्र देतांना उपायुक्त किंवा आयुक्तांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र ती न घेता पवारांनी स्वअधिकारात पत्र देऊन पदाचा दुरुपयोग केला. असा ठपका उपायुक्तांनी ठेवला आहे. पवारांना तीन दिवसाच्या आत नोटीसचे उत्तर द्यायचे आहे. या मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास एकतर्फी प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद त्यांना दिली आहे. (प्रतिनिधी)

नोटीस कुणाला, पद कोणते ?
ही नोटीस नेमकी कुणाला, याबाबत जीएडीकडून खातरजमा केली असता रवींद्र पवारांना नोटीस दिल्याचे सांगण्यात आले. उपायुक्तांच्या स्वाक्षरीने दिलेल्या या नोटीसमध्ये उपअभियंता असलेल्या रवींद्र पवारांच्या नावाखाली कार्यकारी अभियंता २ असे पद लिहिण्यात आले आहे. याशिवाय आपण कार्यकारी अभियंता २ या जबाबदारीच्या पदावर कार्यरत आहेत, असे नमूद आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे उल्लंघन
नगरसेवकांना पत्र देतांना पवारांनी आयुक्त किंवा उपायुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते. मात्र पवार यांनी स्वअधिकारात पत्र देऊन पदाचा दुरुपयोग केला व महापालिकेची प्रतिमा मलीन केली. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील नियम ३ (१), (२), (३) चे उल्लंघन केल्याचा ठपका रवींद्र पवारांवर ठेवण्यात आला आहे.

Web Title: Municipal corporation's image will be fine!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.