आयुक्त कार्यशाळेत महापालिकेत ‘कर ’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:11 PM2017-08-22T23:11:11+5:302017-08-22T23:11:46+5:30

महापालिकेचा प्रशासकीय कारभार ताळ्यावर आणून अधिकारी कर्मचाºयांमध्ये शिस्त आणू पाहणाºया आयुक्तांच्या संकल्पनेला पुन्हा एकदा हरताळ फासण्यात आला.

Municipal Corporation's 'tax' in the workshop! | आयुक्त कार्यशाळेत महापालिकेत ‘कर ’!

आयुक्त कार्यशाळेत महापालिकेत ‘कर ’!

Next
ठळक मुद्देदुपारनंतर शुकशुकाट : विनापरवानगी दांडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिकेचा प्रशासकीय कारभार ताळ्यावर आणून अधिकारी कर्मचाºयांमध्ये शिस्त आणू पाहणाºया आयुक्तांच्या संकल्पनेला पुन्हा एकदा हरताळ फासण्यात आला. आयुक्त हेमंत पवार हे एका कार्यशाळेसाठी मुंबईला गेल्याचे समजताच अनेक अधिकारी, कर्मचारी दुपारी १२ नंतर कार्यालयाबाहेर पडले. अनेक कर्मचारी दुपारी भोजनाच्या नावावर बाहेर गेले ते ५.४५ पर्यंत कार्यालयात पोहोचलेच नाहीत.‘कर’ साजरी करण्यासाठी अनेकांनी अधिकृत रजा न घेता दांडी मारणे पसंत केले.
महापालिकेचे कर्मचारी वेळेवर कार्यालयात यावेत, यासाठी आयुक्तांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या. मात्र त्यानंतरही या प्रशासकीय लेटलतिफीला आळा न बसल्याने कर्मचाºयांची हजेरी तपासण्याचे आदेश काढण्यात आले. त्याची जबाबदारी विविध विभागप्रमुखांवर टाकण्यात आली. सुरुवातीची काही दिवस नित्यनेमाने हजेरी तपासण्यात आली. त्याचा अहवाल आयुक्तांच्या स्विय सहायकाकडे पाठविला जाऊ लागला.मात्र आता परिस्थिती ‘पहिले पाढे पंचावन्न’ झाली आहे. अनेक विभागात कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतानाही ‘सर्व हजर’अशा नोंदी होऊ लागल्या आहेत. आयुक्त काय तर तीन वर्षांत बदलून जातील. आपल्याला येथेच काम करायचे आहे, असा भावनात्मक प्रश्न उपस्थित करून आयुक्त सोडून ‘आपण सर्व भाऊ भाऊ’ अशी संकल्पना मांडली जात आहे. हजेरी तपासणीचा सध्याची स्थिती ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अशी झाली आहे. या परिस्थितीत आयुक्त काही कामानिमित्त अमरावती बाहेर असले की बहुतांश अधिकारी कर्मचाºयांचे घोडे गंगेत न्हातात. त्याच पार्श्वभूमिवर मंगळवारी आयुक्त नसणे आणि त्यातच कर आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला. अनेकांनी रीतसर परवानगी न घेता व रजा मंजूर करवून न घेता कर व करीची सुटी एन्जॉय केला. महापालिकेचा लेखा विभाग, भांडार विभाग आणि बांधकाम विभागासह अन्य विभागांतही दुपारनंतर निरव शांतता अनुभवयाला मिळाली.
उपायुक्तांकडे जबाबदारी
आयुक्त हेमंत पवार आणि उपायुक्त महेश देशमुख हे एका कार्यशाळेनिमित्त मुंबईला आहेत. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे प्रशासकीय दौºयानिमित्त बाहेरगावी आहेत. त्यामुळे १६०० कर्मचाºयांची जबाबदारी प्रशासकीय प्रमुख म्हणून महापालिकेत उपस्थित असलेल्या उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडे होती. महापालिकेचे मुख्य लेखाधिकाºयांनी मंगळवारी अधिकृत रजा घेतली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. एकंदरितच महापालिकेत मंगळवारी संपूर्ण दिवसभर करीचा माहौल दिसून आला.

Web Title: Municipal Corporation's 'tax' in the workshop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.