नगरपरिषदांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी

By admin | Published: February 22, 2016 12:45 AM2016-02-22T00:45:10+5:302016-02-22T00:45:10+5:30

नगरपरिषदा या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी आपली स्वत: उत्पन्नाची साधने निर्माण करावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

Municipal councils should create their own income generating tools | नगरपरिषदांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी

नगरपरिषदांनी स्वत:ची उत्पन्नाची साधने निर्माण करावी

Next

पालकमंत्री पोटे : शौचालय, घनकचऱ्याची कामे महत्त्वाची
अमरावती : नगरपरिषदा या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांनी आपली स्वत: उत्पन्नाची साधने निर्माण करावीत, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे नगरसेवक यांचा आढावा बैठक ना. पोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नगर परिषद प्रशासनाचे प्रभारी अधिकारी रामदास सिध्दभट्टी, चिखलदऱ्याचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी तसेच नगराध्यक्ष नंदवंशी, रवींद्र थोरात, अभिजित सराडे, अर्चना राऊत, प्रतिभाताई कटिस्कर, सरिताबाई खेरडे, विना ठाकरे, नगर परिषद प्रशासन तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे अध्यक्ष व मुख्याधिकारी उपस्थित होते.
ना.पोटे म्हणाले की, कोणताही भेदभाव न ठेवता जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचा विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीकडून आठ लाख रुपये देण्याचा निर्णय झाला. त्यापैकी पाच लाख रुपये थेट देण्यात आले आहेत. नगर परिषद क्षेत्रात घरकूल, शौचालय आणि घनकचऱ्याची कामे महत्त्वाची असून याकामी मुख्याधिकाऱ्यांंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यात सध्या पालकमंत्री पांदण रस्ते विकास अभियान सुरू आहे.
राज्यभर अमरावती पॅटर्न म्हणून आपल्या धर्तीवर ही कामे घेण्यात येत आहेत. तशाच प्रकारे जिल्हा परिषदांच्या शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात येईल. घरकुलांच्या संदर्भात या आठवड्यात निर्णय घेण्यात येईल. गावातील स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचे उपक्रम घेण्यासाठी स्वयंसेवी संस्था किंवा लोकसहभागातून घ्यावीत. तसेच गावातील चौकाचे सुशोभिकरण, घनकचरा व्यवस्थापनेचीही कामे घ्यावीत. एमआरईजीएसमार्फत गावात कवठ, चिंच, मोह अशी पूर्ण वाढ झालेली पाच हजार झाडे लावण्यात येतील. अमरावती आणि अचलपूरसाठी २५० घरांचे क्लस्टर तयार करण्यात येईल. शासनाकडून सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी परदेशी म्हणाले की, शासनाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. निधीची अडचण असेल तर प्रत्यक्ष संपर्क साधावा. १४ व्या वित्त आयोगाचे प्रस्ताव आहेत. घरकुल योजनेची क्षेत्रीय योजनां संदर्भात वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, चिखलदराचे नगराध्यक्ष सोमवंशी, इतर नगर सेवक यांची समयोचित भाषणे झाली. घरकुल वाटप, निधीचे समान वाटप, कर्मचारी मुख्यालयी राहाणे, शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, शौचालय बांधकामासाठीचे दुसरा हप्ता लवकर वितरीत करावा, रस्ते विकास निधी लवकर मिळावा, अशा मागण्या यावेळी नगरसेवकांनी केल्यात. जिल्हाधिकारी किरण गित्ते आणि उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संचालन येवतीकर यांनी आभार ठाकरे यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal councils should create their own income generating tools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.