महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:13 AM2021-05-10T04:13:15+5:302021-05-10T04:13:15+5:30
----------------------------------------------------------------------------- महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित अमरावती : महानगरपालिका कर्मचारी-कामगार संघ, अमरावतीच्यावतीने पुकारण्यात आलेला ११ मे रोजीचा संप स्थगित करण्यात ...
-----------------------------------------------------------------------------
महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित
अमरावती : महानगरपालिका कर्मचारी-कामगार संघ, अमरावतीच्यावतीने पुकारण्यात आलेला ११ मे रोजीचा संप स्थगित करण्यात आला आहे. १ जानेवारी २००६ ते ३० एप्रिल २०१० दरम्यान सहाव्या आयोगाच्या थकबाकीच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता. मात्र, कोविड स्थितीमुळे तो मागे घेतल्याचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी सांगितले.
---------------------
गुरुकुंजात बीएसएनएल सेवा ठप्प
गुरुकुंज मोझरी (अमरावती) : राष्ट्रसंतांच्या गुरुकुंजात शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस झाला. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित होता. त्यापाठोपाठ बीएसएनएलची दूरसंचार व्यवस्था बंद पडली. वीजपुरवठा पहाटे साडेचारला सुरळीत झाला तरी सायंकाळी ५ पर्यंत बीएसएनएलची सेवा ठप्प होती. गुरुदेवनगर येथे आधी जनरेटर उपयोग घेतला जात होता. आता तो बंद आहे.
----------
गुरुकुंजात पाऊस, बीएसएनएल सेवा ठप्प
गुरुकुंज मोझरी (अमरावती) : राष्ट्रसंतांच्या गुरुकुंजात शनिवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वादळी पाऊस झाला. त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित होता. त्यापाठोपाठ बीएसएनएलची दूरसंचार व्यवस्था बंद पडली. वीजपुरवठा पहाटे साडेचारला सुरळीत झाला तरी सायंकाळी ५ पर्यंत बीएसएनएलची सेवा ठप्प होती. गुरुदेवनगर येथे आधी जनरेटर उपयोग घेतला जात होता. आता तो बंद आहे.
---------------
तिवस्यात अवैध दारूवर कारवाई
तिवसा : तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांवर तिवसा पोलिसांनी कारवाया केल्या. तिवसा शहरातील जुन्या तहसील गेटजवळ पोलिसांनी सात लिटर गावठी दारू जप्त केली. आनंदवाडी येथून पोलिसांनी दोन हजारांची २० लिटर गावठी दारू जप्त केली. तळेगाव ठाकूर येथून पोलिसांनी १० नग देशी दारू बॉटल जप्त केल्या. एकूण तीन कारवायामध्ये ३१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.