महापालिकेचा नारा; ‘एक कुटूंब, एक वृक्ष’; अमरावतीकरांच्या उपस्थितीत वृक्षदिंडी
By प्रदीप भाकरे | Published: July 24, 2023 04:21 PM2023-07-24T16:21:51+5:302023-07-24T16:21:59+5:30
महानगरपालिकेच्या ‘एक कुटूंब, एक वृक्ष’ या अभियाना अंतर्गत २४ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात आली. आयोजन केले होते. आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पुजन करण्यात आले.
अमरावती - महानगरपालिकेच्या ‘एक कुटूंब, एक वृक्ष’ या अभियाना अंतर्गत २४ जुलै रोजी वृक्ष दिंडी काढण्यात आली. आयोजन केले होते. आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पुजन करण्यात आले.
राजापेठ बस स्टॅंन्ड येथून निघालेल्या वृक्षदिंडीचा इर्विन चौक येथे समारोप करण्यात आला. या दिंडीत चित्ररथ तसेच जनजागृती करीता वृक्ष संवर्धन करणारे संदेश फलक तयार करण्यात आले होते. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी निमित्य पथनाट्याचे सादरीकरण केले.
सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वड, पिंपळ, चिंच या सारख्या देशी झाडांची लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आयुक्त देविदास पवार यांनी केले. ‘एक कुटूंब, एक वृक्ष’ या अभियाना अंतर्गत प्रत्येक कर्मचा-याला वृक्षारोपण व संवर्धन करीता किमान ५० घरांचे पालकत्व स्विकारायचे आहे. यावेळी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सिमा नैताम, शहर अभियंता इकबाल खान, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, योगेश पिठे, धनंजय शिंदे, तौसिफ काझी, अधीक्षक लिना आकोलकर, महिला व बाल कल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे, अमित डेंगरे, श्रीकांत गिरी, प्रविण इंगोले, श्रीकांतसिंह चव्हाण मदन तांबेकर, पी.यु.वानखडे, उदय चव्हाण सहभागी झाले.
महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी
वृक्षदिंडीमध्ये उपअभियंता, अभियंता, मनपा अधिकारी, कर्मचारी, सर्व शहरी आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, कर्मचारी, पारिचारिका, एनएसएसचे विद्यार्थी, पी.आर.पोटे,ब्रिजलाल बियाणी, शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी, स्वामी नारायण महिला मंडळ सत्संग वडाळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.