एलबीटी वसुलीसाठी महापालिकेचे धाडसत्र

By admin | Published: November 15, 2016 12:13 AM2016-11-15T00:13:37+5:302016-11-15T00:13:37+5:30

महापालिकेतील एलबीटी पथक थकीत एलबीटी वसुलीसाठी सरसावले आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्याची सोय ...

Municipal trials for recovery of LBT | एलबीटी वसुलीसाठी महापालिकेचे धाडसत्र

एलबीटी वसुलीसाठी महापालिकेचे धाडसत्र

Next

कोटींची वसुली : रोहित बीयर शॉपी सिल
अमरावती : महापालिकेतील एलबीटी पथक थकीत एलबीटी वसुलीसाठी सरसावले आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारण्याची सोय महापालिकेने उपलब्ध केल्याने या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करीत रकमेचा भरणा करण्यास नकार देणाऱ्यांची प्रतिष्ठाने सील करण्यात येणार आहे. मागील तीन दिवसांमध्ये एलबीटी विभागाने १ कोटी रुपये कर वसूल केला आहे. त्यात बडे व्यावसायिकांचा भरणा आहे.
राज्य सरकार ने सद्यानिर्मिती आणि मद्यविक्रेत्यांवर पुन्हा एलबीटी आकारणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने एलबीटी विभागाने मोहीम राबवून वसुलीसाठी पथके कार्यान्वित केली आहेत. आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त विनायक औगड यांच्या निर्देशानुसार शनिवारी १.४७ लाख रुपयांच्या थकीत करापोटी राजापेठ येथील रोहित बियर शॉपी सील करण्यात आले. मात्र त्यानंतर लगेच संबंधितांनी रक्कम भरल्याने सील काढण्यात आले. कर भरण्यासाठी ५०० आणि १०००च्या नोटा स्विकारार्ह असल्याने करधारक एलबीटी पासून मुक्त होण्याच्या पावित्र्यात आहेत. खापर्डे बगीचा स्थित होटल मराठा प्राईडने २० लाख रुपयांचा धनादेश दिला, तर विद्यापीठ रस्त्यावरील होटल प्रेसिडेंट बार ने १५.६६ लाखांचा धनादेश दिला तर रंगोली वाईनने १८ लाख रुपयांचा धनादेशाद्वारे भरणा केला. उल्लेखनीय म्हणजे या कारवाईवेळी महापालिका आयुक्त हेमंत पवार प्रत्यक्ष उपस्थित होते, हे विशेष. (प्रतिनिधी)

स्थानिक संस्था कर थकबाकीदारांनी थकीत रक्कम त्वरित भरून महापालिकेला सहकार्य करावे. प्रशासकीय कारवाई टाळावी़
- हेमंत पवार,
आयुक्त, महापालिका

Web Title: Municipal trials for recovery of LBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.