महापालिकेत आता वाहनांसाठी दोन लॉगबूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:33+5:302021-06-16T04:16:33+5:30

अमरावती : महापालिकेचा कारभार हल्ली ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. तथापि, वाहनांच्या इंधनावर होणारा खर्च आणि देयकांमध्ये ...

The municipality now has two logbooks for vehicles | महापालिकेत आता वाहनांसाठी दोन लॉगबूक

महापालिकेत आता वाहनांसाठी दोन लॉगबूक

Next

अमरावती : महापालिकेचा कारभार हल्ली ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असा सुरू आहे. तथापि, वाहनांच्या इंधनावर होणारा खर्च आणि देयकांमध्ये विलंब हे या माध्यमातून शोधले जाणार आहे. याबाबतचे निर्देश उपायुक्तांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

शहरातील प्रशांतनगर स्थित वाहन कार्यशाळा विभागात काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वाहनातून इंधन चाेरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर दरमहा इंधनावर होणाऱ्या खर्चावर प्रशासनाने लक्ष वेधले आहे. आता इंधनाची नोंद, वाहन वापर आणि यंत्र सामग्रीची नोंद सम व विषम अशा दोन प्रकारे ठेवावी लागणार आहे. लॉगबूकच्या अनुषंगाने देयके निर्गमित होतील, असे उपायुक्तांनी यांनी स्पष्ट केले आहे. वाहन, इंधन आणि यंत्र सामग्री अशी कोणत्याही प्रकाराची देयके प्रलंबित राहू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, पक्षनेता, गटनेता, आयुक्त, उपायुक्त, विभागप्रमुख आदींच्या दिमतीला असलेल्या वाहनांची दोन लॉगबूक ठेवावे लागणार आहेत.

--------------

वाहन वापराचे दोन लॉगबूक ठेवण्याचे निर्देश आहेत. अगोदर एकच लॉगबूक हाताळले जात होते. त्यामुळे देयकांना विलंब व्हायचा. ऑडिट, लेखा विभागात देयके प्रलंबित असायची. मात्र, देयकात पारदर्शकता आणण्यासाठी दोन लॉगबूक हाताळले जाणार आहेत.

- रवींद्र अनवाने, वाहन कार्यशाळा प्रमुख, महापालिका.

Web Title: The municipality now has two logbooks for vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.