केबल काढण्याच्या वादातून वधुुपित्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:12 AM2021-04-17T04:12:47+5:302021-04-17T04:12:47+5:30

चांदूर रेल्वे : घरावरील केबल काढल्याचा आरोप करून एका ४५ वर्षीय इसमाच्या डोक्यावर लोखंडी अ‍ँगलने वार करून हत्या करण्यात ...

Murder of bridegroom over cable removal dispute | केबल काढण्याच्या वादातून वधुुपित्याची हत्या

केबल काढण्याच्या वादातून वधुुपित्याची हत्या

Next

चांदूर रेल्वे : घरावरील केबल काढल्याचा आरोप करून एका ४५ वर्षीय इसमाच्या डोक्यावर लोखंडी अ‍ँगलने वार करून हत्या करण्यात आली. १६ एप्रिल रोजी सकाळी ७ च्या सुमारास येथील खडकपुरा भागात ही घटना घडली.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. सुखदेव मारोतराव लुटे, (४५, खडकपुरा) असे मृताचे, तर राजेश ऊर्फ राजू गोविंदराव मोहतुरे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी अनिता सुखदेव लुटे,(४०) यांनी फिर्याद नोंदविली. सुखदेव व अनिता या दाम्पत्याच्या मुलीचे २१ एप्रिल रोजी विवाह आहे.

तक्रारीनुसार, मुलगी शिवानी हिचे २१ एप्रिल रोजी लग्न असल्यामुळे घरावर सावली करण्यासाठी सुखदेव लुटे यांनी लाकडी बल्ल्या बांधण्यासाठी केबलचा वापर केला होता. या कारणावरून १६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजतादरम्यान आरोपी राजू मोहतुरे हा लुटे यांच्या घरी आला. माझ्या घरावरील केबल का काढला, असे म्हणून त्याने सुखदेव लुटे यांच्याशी वाद घातला. मी केबल काढला नाही, असे सांगितल्यामुळे आरोपी राजू याला अतिशय राग आला व त्याने लगेच घरातून लोखंडी अँगल आणून सुखदेव यांच्या डोक्यावर जोराने मारला. तो डोक्याला मध्यभागी लागल्यामुळे लुटे जागेवरच खाली कोसळले व त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ते पाहून राजू मोहतुरेने पळ काढला.

सुखदेव लुटे यांना जखमी अवस्थेत मुलगी शिवानी व शेजारील अक्षय शेलोकार व विनोद लकडे यांनी मुकेश लोणारे यांच्या ऑटोरिक्षात टाकून चांदूर रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी लुटे यांना मृत घोषित केले. लग्नाच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वी पित्याचा मृत्यू झाल्याने उपवर मुलीसह तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला त्वरेने अटक करण्यात आली.

----------------

Web Title: Murder of bridegroom over cable removal dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.