वरूड येथे दगडाने ठेचून युवा मूर्तिकाराची हत्या

By admin | Published: September 30, 2016 12:20 AM2016-09-30T00:20:43+5:302016-09-30T00:20:43+5:30

स्थानिक आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एका तरूण मूर्तिकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

The murder of the crushed young sculptor at the Worwood stone | वरूड येथे दगडाने ठेचून युवा मूर्तिकाराची हत्या

वरूड येथे दगडाने ठेचून युवा मूर्तिकाराची हत्या

Next

आठवडीबाजारातील घटना : आरोपीला अटक, गमतीचा विपर्यास भोवला
वरूड : स्थानिक आठवडी बाजार परिसरात मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास एका तरूण मूर्तिकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी घडली. वरूड पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मृताचे नाव गजानन गणेशराव बेदरकर (३७,रा.वरुड) तर आरोपीचे नाव विकी प्रभाकर कोहळे (२०,रा. आठवडीबाजार, वरूड) असे आहे. मृत गजानन बेदरकर आणि आरोपीचे मैत्रीचे संबंध होते. बुधवारी रात्री ११.३० वाजता गजानन बेदरकर हे आठवडी बाजारात गेले असता त्यांना तेथे विकी कोहळे भेटला. दोघांमध्ये थट्टामस्करी सुरू झाली. थट्टामस्करीचे रूपांतर वादात झाले. वाद विकोपाला गेला आणि आरोपी विकी कोहळे याने गजानन बेदरकर यांच्या डोक्यावर दगडाने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वरूड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताला ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. पोलिसांनी रात्रीच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपी विकी कोहळेविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, ठाणेदार गोरख दिवे यांनी भेट देऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी विकीने केवळ थट्टा मस्करीतून ही हत्या केली की यामागे पूर्ववैमनस्याचा प्रकार आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. युवा कलावंताच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

उत्कृष्ट कलावंत होता गजानन
मृत गजानन बेदरकर हा शहरातील एक उत्तम कलावंत होता. त्याने घडविलेल्या मूर्तींना गणेशोत्सव, दुर्गोत्सवासह इतरवेळीदेखील प्रचंड मागणी राहात असे. शिवाय तो कुटुंबातील एकमेव कर्ता पुरूष होता. त्याच्या आकस्मिक व धक्कादायक मृत्यूमुळे त्याचे कुटुंब वाऱ्यावर आले आहे. शिवाय शहरातही या गुणी कलावंताच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे.

मूर्तिकारांमध्ये हळहळ
गणेशोत्सवादरम्यान मूर्तिकार गजानन याने अनेक सुरेख मूर्तींंची निर्मिती केली होती. नवदुर्गोत्सव तोंडावर असल्याने तो दुर्गेच्या मूर्ती घडविण्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याच्या निधनाने समव्यावसायिक हळहळले.

आरोपी विकी प्रभाकर कोहळे व मृत गजानन गणेश बेदरकर हे चांगले मित्र होते. आठवडीबाजारात त्यांच्यामध्ये थट्टा-मस्करी सुरू असताना अचानक वाद उद्भवला असावा. याच वादात संताप अनावर होऊन अकस्मात विकीच्या हातून गजाननचा खून झाला, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेमागे दुसरे कारण तर नाही, ना याचा शोध घेतला जात आहे.
- गोरख दिवे, ठाणेदार, वरूड

Web Title: The murder of the crushed young sculptor at the Worwood stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.